विदेश

युद्ध भडकले, इस्त्रायल चा 100.लढाऊ विमान आणि जेट फायटरने लेबनान वर हल्ला 

Spread the love
इस्त्रायल / इंटरनॅशनल डेस्क

हिजबुलाहच्या हमल्यावर इतर्यालनने जोरदार प्रत्युत्तर देत लेबनान मध्ये घुसत सीमावर्ती भागातील दहशतवादी तळावर 100 लढाऊ विमान आणि जेट फायटर च्या साह्याने हल्ला चढवला आहे.मुख्य म्हणजे बायडेन या परिस्थितीवर नजर ठेऊन आहेत.

इराण समर्थित हिजबुल्लाह ही संघटना मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होती. हिजबुल्लाहने लेबनॉनच्या धरतीवरुन इस्त्रायलवर 320 पेक्षा अधिक कत्युशा क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. वरिष्ठ कमांडर फहाद शुक्र याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याचा दावा हिजबुल्लाहने केला होता.

रविवारी सकाळी इस्त्रायलवर हल्ला केल्याची पुष्टी लेबनॉनच्या हिजबुल्लाहने केली. बैरुत येथे त्यांच्या कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इस्त्रायलवर हल्ला चढवल्याचा दावा त्यांनी केला. बैरूत येथील दक्षिणेतील एका उपनगरात हिजबुल्लाहचा वरिष्ठ अधिकारी फवाद शुक्र हा ठार झाला होता. त्यानंतर हिजुबल्लाहने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला.

हिजबुल्लाहविरोधात आक्रमक होत इस्त्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलेंट यांनी पुढील 48 तासांसाठी आणीबाणी घोषीत केली आहे. तर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी उत्तरेतील या धुमश्चक्रीबाबत माहिती देण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. जो आमचे नुकसान करेल, आम्ही त्याचे नुकसान करु, त्याला करारा जवाब देऊ असे नेतन्याहू यांनी या बैठकीत स्पष्ट केले. Times Of Israel च्या वृत्तात यासंबंधीचा उल्लेख करण्यात आला आहे.

इस्त्रायलच्या लढाऊ विमानांनी लक्ष्याचा अचूक भेद केल्याचा दावा करण्यात आला आहे. हिजबुल्लाह रॉकेट लाँचर बॅरलवर हल्ला चढवला होता. त्यात ते सर्व नष्ट झाल्याचा दावा इस्त्रायलच्या लष्कराने केला. या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या लेबनॉनमधील 40 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.

या नवीन धुमश्चक्रीवर अमेरिका  नजर ठेऊन आहे. इस्त्रायल-हिजबुल्लाह यांच्यातील तणावावर अमेरिकेचे लक्ष असल्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट केले. इस्त्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकारांचे आपण समर्थन करत असल्याचे बायडेन यांनी सांगितले. त्याचवेळी या भागात शांतता नांदावी हा पण अमेरिकाचा प्रमुख उद्देश असल्याचे ते म्हणाले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close