अखेर युवासेनेच्या आंदोलन ईशार्याची दखल—उपजिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांच्या निवेदनाला यश
जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी काढले त्या डाँक्टरचे सेवा समाप्तीचे आदेश
दर्यापूर (कैलास कुलट)-
मागील महिन्यात दर्यापूर उपजिल्हा रुग्णालय येथे नियमितप्रमाणे रुग्णांची तपासणी सुरु असतांना एक आदिवासी ७ ( सात ) महिन्याची गर्भवती महिला सोनोग्राफी करण्याकरीता डॉ.प्रकाश तायडे यांचेकडे त्यांच्या नियोजित दिवशी ( सोमवार ) तपासणीकरीता गेली असता आदिवासी महिलेची सोनोग्राफी न करता ‘तुझ्या अंगाचा वास येत आहे,तू हात पाय धुवून ये, मगं तुझी सोनोग्राफी करतो’ असे म्हटले. त्यामुळे ती महिला हातपाय धुवून आली, तरी डॉ.प्रकाश तायडे यांनी तिला पुन्हा दुसऱ्यांदा हातपाय धुण्यास सांगितले, ती महिला पुन्हा हातपाय धुवून आली असता तिची सोनोग्राफी केली परंतु तुझ्या अंगाचा वास येत असल्यामुळे तुझ्या सोनोग्राफीचा रिपोर्ट सर्वात शेवटी देण्यात येईल असे म्हटले व तिला सर्वात शेवटी रिपोर्ट दिला. उपजिल्हा रुग्णालयामध्ये होत असलेल्या अशोभनीय कृत्याबाबत कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी एका आदिवासी महिलेसोबत अशी गलिच्छ वागणूक देण्याची घटना उपजिल्हा रुग्णालय येथे घडली होती डॉ. प्रकाश तायडे यांचा स्वतःचा खाजगी दवाखाना असून तेथे येणाऱ्या रुग्णाशी अशी वागणुक का? करीता डॉक्टरांचे कर्तव्य न करता रुग्णाला विनाकारण त्रास देणाऱ्या अशा डॉक्टरांचा परवाना रद्द करण्यात यावा व उपजिल्हा रुग्णालयातून तात्काळ निलंबन करण्यात यावं, या मागणीचा निवेदन. युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले होते. त्या निवेदनानुसार चौकक्षी समिती स्थापन करुन अहवालानुसार तो डॉ दोषी आढळला. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी दर्यापुर वैद्यकीय अधिकारी यांना दि.०६/०७/२३ रोजी आदेश देवुन डॉ. प्रकाश तायडे यांचे उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथून सेवा समाप्त केली.