महिलेकडून अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण ; पालकांच्या तक्रारी नंतर गुन्हा दाखल

हैदराबाद / नवप्रहार ब्युरो
एका उच्चभ्रू सोसायटीत एकाच घरात कामाला असलेल्या महिलेकडून १० व्या वर्गात शिकणाऱ्या मुलाचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलाची तब्येत खालावत असल्याने पालकांनी त्याला आस्थेने विचारपूस केल्यावर हा प्रकार समोर आला आहे. पालकांनी महिले विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मुलगा आणि सदर महिला, दोघेही एकाच घरात घरकाम करतात. त्यांच्यात संमतीने संबंध निर्माण झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. मुलाच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे नुकतेच दहावीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांच्या मुलाची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नाही. तो अस्वस्थ झाल्याचे आम्हाला दिसून आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर किशोरवयीन मुलाने याबद्दल त्याच्या पालकांना नेमके काय घडले आहे ते सांगितले. यातून शेजारच्या एका महिलेने त्याचे अनेकवेळा लैंगिक शोषण केल्याची गोष्ट समोर आली.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, “जेव्हा मुलाच्या पालकांना हा प्रकार लक्षात आला तेव्हा त्यांनी तक्रार दाखल केली. हा पोक्सो कायद्याअंतर्गतचा गुन्हा आहे. या प्रकरणात मुलग्याची संमती असो वा नसो, हा एक गुन्हा असून कायद्यानुसार कारवाई केली जाईल,” असे पश्चिम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुलगा आणि ती महिला तसेच मुलाचे पालकही घरकाम करतात. मुलगा आणि महिलेची एकमेकांची चांगली ओळख आहे. ते घरी एकत्र काम करतात, असेही सांगण्यात आले. POCSO कलमांव्यतिरिक्त, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत येणाऱ्या कलमांचाही एफआयआरमध्ये समावेश केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
मुलांना लैंगिक शोषण, गुन्हे वाढले
पोक्सो कायद्याअंतर्गत, १८ वर्षांखालील मुलांना लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि पोर्नोग्राफीपासून संरक्षण देण्यासाठी एक व्यापक कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे. हैदराबाद शहर पोलिसांच्या माहितीनुसार, शहरात POCSO अंतर्गत नोंद गुन्ह्यांची संख्या २०२३ मधील ३७१ प्रकरणांच्या तुलनेत ४४९ वर पोहोचली आहे. अशा प्रकरणामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.