हटके

अजबच हं ….! म्हणे भूत देखील मरतात

Spread the love

                      आम्ही या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला ज्या विषयाबद्दल सांगणार आहोत त्याचे आम्ही समर्थन करत नाही. किंवा आम्ही  अंधविश्वासु नाही. आणि लोकांच्या मनात आम्हाला भीती देखील निर्माण करायची नाही. पण काही गोष्टी समोर आल्या पाहिजेत ज्या बद्दल लोकांत कुतूहल आहे. ही बातमी देखील तशीच आहे.

भुत अस्तित्वात आहे की नाही हे कोणालाही माहिती नाही. हे प्रत्येक व्यक्तीच्या विश्वासावर अवलंबून असते. पण कधीकधी पॅरानॉर्मल एक्सपर्ट भूतांबाबत असे दावे करतात, जे आश्चर्यकारक आणि विचित्र असतात.

पॅरानॉर्मल एक्सपर्ट हे भूतांवर संशोधन करणारे लोक असतात. नुकतंच एका इंग्लिश पॅरानॉर्मल तज्ज्ञाने भूतांबद्दल जे सांगितले ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तथापि, त्यांच्या या वक्तव्यांवर विश्वास ठेवणे कठीण आहे!

डेली स्टार न्यूज वेबसाइटनुसार, पॅरानॉर्मल एक्सपर्टचा असा विश्वास आहे की भूतांचा मृत्यू होत आहे. काही पॅरानॉर्मल एक्सपर्टनी दावा केला आहे की त्यांनी जगातील 100 झपाटलेल्या ठिकाणांना भेट दिली आणि तेथे उपस्थित असलेल्या आत्म्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. या संभाषणात त्यांना समजले की तेथे भटकणारे आत्मे 100 वर्षे किंवा त्याहूनही कमी वर्षांपासून तिथे वास्तव्य करत आहेत. यावरून त्यांनी अंदाज लावला की 100 वर्षांनंतर भुते मरतात!

ब्रिटेन आणि अमेरिकेमध्ये स्थित पॅरानॉर्मल रेस्क्यू सर्व्हिसचे हेड आणि पीएचडी स्कॉलर ब्रायन स्टर्लिंग व्हीट म्हणतात की, ज्या भूतांची लोकांमध्ये चर्चा आणि भीती होती ती कदाचित आता मेलेली असतील किंवा मरणार आहेत. ‘हाफ लाइफ’ या त्यांच्या एका प्रकल्पाचा अहवाल सुमारे 10 वर्षांच्या पॅरानॉर्मल संशोधनावर आधारित आहे, ज्याच्या आधारावर ब्रायनने हे सांगितले आहे. त्यांच्या संशोधनातून हेही समोर आले आहे की, जी भुते सर्वात प्रसिद्ध झपाटलेल्या ठिकाणी वारंवार दिसायची, ते आता कमी दिसतात किंवा ऐकू येतात. अनेकांवर वर्षानुवर्षे चर्चाच झालेली नाही.

‘प्रोजेक्ट हाफ-लाइफ’नुसार, भूतांच्या आयुष्यालाही एक मर्यादा असते. ते 100 वर्षांपर्यंत जगू शकतात, त्यानंतर ते मरतात. तथापि, ब्रायन म्हणतात की याचा संबंध भूतांच्या मृत्यूशी जोडला जाऊ शकत नाही, उलट असे मानले जाऊ शकते की त्यांची ऊर्जा कालांतराने नष्ट होते. या संशोधनातून ते अशा निष्कर्षापर्यंत पोहोचले की माणूस एकदा नव्हे तर दोनदा मरतो. या गोष्टीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close