सामाजिक

मुंबई मंत्रालयावर अपंगांचा सामुहिक आत्मदहन आंदोलनाचा ईशारा

Spread the love

राज्यातील अपंगांना निराधार योजनेचे मानधन दरमहा रु. ५,०००/- करा

अमरावती  / प्रतिनिधी

देशातील सर्वात गरीब घटक अपंग असून या घटकाचा जलदगतीने विकास व्हावा. केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना व सवलती सुरु केल्या आहेत. हा घटक अजूनपर्यंत विकास व पुनर्वसनापासून वंचित राहत आहे. अपंगांची- नवसंजीवनी असलेली निराधार योजना असून या योजनेच्या तुटपुंज्या रु. १५००/- दरमहा मानधनावर अपंग बांधव एक महिना कसातरी उदरनिर्वाह करीत आहे. अनेक राज्यामध्ये निराधार योजनेचे मानधन तेथील स्थानिक राज्यसरकारने दुप्पट-तिप्पट वाढविले आहे. परंतु महाराष्ट्र राज्य प्रगतीशिल राज्य असून सुद्धा अपंगांचे मानधन वाढविण्यास दुर्लक्ष करीत आहे. मानधन वाढीसंदर्भात अनेक आंदोलने केली व त्या संदर्भात मंत्रालयातील वरिष्ठ अधिका-यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका सुद्धा घेतल्या परंतु प्रत्येक वेळी आश्वासन देवून अपंगांची दिशाभुल व फसवणूक केल्या जात आहे. राज्य सरकारने अपंगांच्या निराधार योजनेचे मानधन दरमहा रु. ५०००/- करण्यात यावे यासाठी त्वरीत कार्यवाही करण्यात यावी यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने राज्य कार्याध्यक्ष जाकीर शेख यांच्या नेतृत्वात बुधवार दि. १४/०३/२०२४ रोजी मुंबई मंत्रालयावर राज्य कार्यकारणीसह अपंगांचे सामुहिक आत्मदहन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व अपंगांनी न चुकता या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे राज्य महासचिव राजीक शाह यांनी एका अधिकृत पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close