हटके

भाग्य सोबत असले की मग काहीच बिघडत नाही 

Spread the love

               म्हणतात न की भाग्य तुमच्या बाजूने असले की मग कोणी तुमचे काहीच बिघडवू शकत नाही. भाग्य ही बाब फक्त मनुष्यालाच लागू होते असे नाही . प्राण्यांना देखील भाग्याची सोबत मिळते. हे सिद्ध करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ ने कमी वेळेतच लाखो व्ह्युज मिळविले आहे.

सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर तर कधी थरारक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हिडीओ क्षणात लाखो व्ह्युज मिळवतात. सध्या असाच एक जंगलातील व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक बिबट्या हरणाची शिकार करताना दिसत आहे. हा थरकाप उडवणारा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका बिबट्याला गवताळ प्रदेशात दूरवर उभे असलेले एक हरीण दिसते. हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावताना दिसत आहे. यावेळी बिबट्या आपल्याकडे येत असलेले दिसताच हरीणदेखील जीव तोडून धावते आणि स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी होते.

 

 

 

 

 

 

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @naturee_xplore या अकाउंटवरून शेअर केला असून, त्यावर आतापर्यंत जवळपास दशलक्षाहून अधिक व्ह्युज आणि १० लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक नेटकरीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलेय, “बिबट्यापेक्षा हरीणही वेगात धावू शकते.” तर दुसऱ्याने लिहिलेय, “हरणाचे नशीब चांगले होते म्हणून ते वाचले.” तर तिसऱ्याने लिहिलेय, “परफेक्ट व्हिडीओ क्लिक केला आहे.” तर आणखी एकाने लिहिलेय, “बिबट्याच्या हातातून शिकार निसटली”

दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एका व्हिडीओत श्वानाची शिकार करणाऱ्या बिबट्याच्या हातातून शिकार निसटून गेल्याचे दिसले होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close