सामाजिक
कुलरच्या धक्क्याने चिमुकली युक्तीचा अंत; शिवसेना वसाहती मधील घटना
अकोला / दानिश चौधरी
कुलरच्या धक्क्याने एका 7 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अकोला शहरातील शिवसेना वसाहतीत काल रात्री नऊ वाजताच्या दरम्यान घडली. युक्ती गोगे असे या चिमुकलीचे नाव आहे.भाजप माजी नगरसेवक अमोल गोगे यांची मुलगी युक्ती गोगे कुलर जवळ खेळत असताना ही घटना घडली. कुलर मधील एक तार तुटला आणि कुलरच्या जाळीत विद्युत प्रवाह वाहू लागला.खेळता खेळता नकळत या चिमुकलीचा हात कुलरला लागला आणि तिला जोरदार धक्का बसला. आणि येथेच घात झाला. घरच्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी युक्तीला दवाखान्यात दाखल केलं. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1