श्री रामकृष्ण आश्रम येथे माँ सारदा यांची १७२ वी जयंती उत्साहात साजरी
शिव भावे जीव सेवा,मंगल आरती, भजन, अष्टोत्तर नामावली, महाप्रसाद व संकीर्तन
यवतमाळ – विविध सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेली श्रीरामकृष्ण आश्रम यांच्यातर्फे जामनकर नगर येथील श्री रामकृष्ण आश्रम येथे माँ सारदा यांची १७२ वी जयंती भक्तीमय अश्या वातावरणात उत्साहात साजरी केल्या गेली. या जयंतीच्या निमित्ताने शिव भावे जीव सेवा उपक्रमांतर्गत मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 34 गरजू विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेवर जाऊन स्कूल बॅग व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. जयंती प्रसंगी पहाटेपासून मंगल आरती, पुजा, भजन, श्रीसारदा अष्टोत्तर नामावली, दुपारला महाप्रसाद व संध्या आरती नंतर श्री मॉ नाम संकीर्तन कार्यक्रम इ.पार पडले. हा जयंती सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी श्री रामकृष्ण आश्रमचे पदाधिकारी सोबत समस्त भक्तांनी परिश्रम घेतले. या जयंतीप्रसंगी बहुसंख्य भक्त समुदाय व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आले होते.
–