सामाजिक

प्रवासा दरम्यान गुदमरून प्रवाशाचा मृत्यू 

Spread the love
 
नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया
                बिहार मध्ये छट पूजेला वेगळेच महत्व आहे. यावेळी बिहार निवासी व्यक्ती देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात असला  तरी तो यासाठी घरी परततो. दिवाळी ची सुटी आणि छटपूजा यामुळे रेल्वे मध्ये तुफान गर्दी आहे.अनेक दिवसांपूर्वी रिझर्व्हेशन करून सुद्धा तिकीट कन्फर्म होत नाही. मग अनारक्षित डब्याची कंडीशन काय असेल याचा विचार न केलेलाच बरा. अनारक्षित डब्यात पाय ठेवायला देखील जागा नाही. अश्या स्थितीत प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरतच करावी लागते. आणि या स्थितीत ऐका प्रवाशाचा जीव गेल्याची घटना हावडाहून काठगोदामला जाणाऱ्या 13019 बाग एक्स्प्रेसच्या जनरल बोगीत घडली आहे.
पश्चिम बंगालमधील दुर्गापूर स्टेशनवरून तो ट्रेनमध्ये चढला होता. सारणमधील जैतपूर पोलीस स्टेशन हद्दीतील तिवारी टोला येथे राहणारा मजूर दिनेश महातो (32) हा इंजिनपाठच्या तिसऱ्या जनरल बोगीत होता. त्याला सारणमधील एकमा स्थानकावर उतरायचं होतं, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच गर्दीत त्याचा मृत्यू झाला. त्याच्याकडे जनरल तिकीट आढळलं आहे. जनरल बोगीत जास्त गर्दी झाल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या गावकऱ्याने आसनसोलमधील टीटीईला डॉक्टर उपलब्ध करून देण्यास सांगितलं, परंतु डॉक्टर पोहोचू शकले नाहीत.
कंट्रोल रूमच्या सूचनेनंतर, बुधवारी सकाळी 10.10 वाजता मुझफ्फरपूर रेल्वे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांनी दिनेशचा मृतदेह बोगीतून काढला आणि पोस्टमॉर्टेमसाठी एसकेएमसीएचमध्ये पाठवला. या प्रकरणी मुझफ्फरपूर रेल्वे स्थानकाने त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या गावकऱ्याच्या जबाबावरून यूडी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह सारणला नेला. दिनेश महातो हा दुर्गापूर येथील एका प्लॅस्टिक कारखान्यात कामाला होता. छठवेळी कारखाना बंद असतो म्हणून तो इतर कामगारांसह गावी जात होता.
रेल्वे स्टेशन मुझफ्फरपूरचे एसएचओ धर्मेंद्र कुमार यांनी सांगितलं की दिनेशची तब्येत खराब होती. बोगीत खूप गर्दी होती. पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमधून मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. मात्र, त्याच्यासोबत प्रवास करणारा ग्रामस्थ महेश महातोने दिलेल्या माहितीनुसार, त्याला जागा न मिळाल्याने तो उभा राहून प्रवास करत होता. अशातच दिनेशला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आम्ही ट्रेनमध्येच टीटीईची मदत मागितली पण मदत मिळाली नाही.
महेशने सांगितलं की, चित्तरंजन स्टेशननंतर दिनेशची तब्येत आणखी खालावली आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर प्रवाशांनी बोगीत ठेवण्यासाठी जागा करून दिली. बरौनी येथील रेल्वे व रेल्वे स्थानकाच्या कंट्रोल रूमला माहिती देण्यात आली. समस्तीपूर रेल्वे पोलीस ट्रेनपर्यंत पोहोचले तोपर्यंत ट्रेन सुटली. त्यानंतर मृतदेह मुझफ्फरपूरमध्ये उतरवण्यात आला.
रात्री 2.15 नंतर दिनेशचा मृत्यू झाला आणि 2 वाजून 20 मिनिटांनी ट्रेनने चित्तरंजन स्टेशन ओलांडलं. यानंतर महेशने मृतदेहासोबत तब्बल आठ तास प्रवास केला. दरम्यान, दिनेशचे कुटुंबीय त्याच्या संपर्कात होते. त्यांच्या विनंतीवरूनच मृतदेह मुझफ्फरपूरमध्ये उतरवण्यात आला, असं महेशने सांगितलं.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close