क्राइम

कौर्याची परिसीमा .…. 14 वर्षाच्या मुलीची हत्या करून मृतदेहावर केला बलात्कार 

Spread the love

कोलकाता / नवप्रहार ब्युरो 

                     त्याने त्या 14 वर्षाच्या बालिकेला फिरवण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवले. तिला 3 तास फिरवले. ती ओरडू लागली तेव्हा तिला संत्र्याचे आमीष दिले. लं ती शांत बसत नसल्याने तिला जंगलात नेले.  तिची दोरीने आणि स्प्रिंग ने गळा दाबून हत्या केली. त्यांनतर मृतदेहावर बलात्कार केला. आणि मृतदेह पोत्यात भरून जंगलात फेकून दिला. त्यानंतर तो घरी परतला. जेवण केले आणि झोपून गेला. या निर्दयी खुन्याला पोलिसांनी अटक केली आहे.

ही मुलगी 8 वीमध्ये शिकत होती. मागच्या शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली आहे. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता मुलीवर बलात्कार झाल्याचं समोर आलं.

याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही तपासायला सुरूवात केली, तेव्हा सौमित्र रॉय नावाचा एक ई रिक्षाचालक या मुलीला त्याच्या रिक्षेत बसवून घेऊन गेलेला दिसला. यानंतर सौमित्रला ताब्यात घेतलं तेव्हा पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. रिक्षा चालकाने मुलीला जवळपास 3 तास रिक्षेने फिरवलं, यानंतर तो मुलीला जंगलात घेऊन गेला. इकडे त्याने मुलीचा गळा दोरी आणि स्प्रिंगने घोटला आणि तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर नराधमाने मुलीच्या मृतदेहावर बलात्कार केला. कोलकात्याजवळ असलेल्या न्यू टाऊन भागात ही संतापजनक घटना घडली आहे.

संत्र्याचं आमिष दाखवलं

रिक्षाचालकाने पहिले मुलीला संत्र देऊन आमिष दाखवलं. मुलगी ओरडायला लागली तेव्हा रिक्षा चालकाने तिचा गळा घोटला आणि त्याने मुलीच्या गळ्याचं हाड तोडलं. यानंतर त्याने मुलीच्या मृतदेहावर अत्याचार केले. रिक्षाचालकाने मुलीचा मृतदेह पोत्यात बांधून एका नाल्यात टाकला. घरी परतल्यानंतर रिक्षाचालकाने जेवण केलं आणि तो झोपून गेला, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलीस रिक्षा चालकाच्या घरी पोहोचले आणि त्यांनी क्राईम सीन रिक्रिएट करायला सुरूवात केली, तेव्हा रिक्षा चालकाने आपल्या पत्नीसमोरच गुन्ह्याची कबुली दिली. या रिक्षा चालकाने आधीही एक लग्न केलं होतं, या पत्नीला त्याने बराच त्रास दिला, त्यामुळे तिने स्वत:चं आयुष्य संपवलं.

आरोपीच्या पत्नीने सगळं सांगितलं

आरोपी सौमित्रची पत्नी म्हणाली, ‘त्याने मुलीला सांगितलं की मी तुला घरी सोडेन, माझं घरही तिकडेच आहे. यानंतर तो तिला सोनाहाटी का सोनाहाटपूरला घेऊन गेला, तिकडे त्याने स्प्रिंगने मुलीचा गळा घोटून हत्या केली. यानंतर त्याने मृतदेहावर बलात्कार केला आणि मग पोत्यात मृतदेह बांधून फेकला, त्याने आपला गुन्हा स्वीकारला आहे.’

‘सौमित्रचं पहिलं लग्न झालं होतं, हे मला माहिती नव्हतं. त्याने मला नंतर सांगितलं की मी मंदिरात लग्न केलं होतं, पण पत्नीचे वडील तिला घरी घेऊन गेले. यानंतर पत्नी घरी आली आणि तिने जीवन संपवलं, ही मुलगी अल्पवयीन होती’, असं सौमित्रची पत्नी म्हणाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आणखी पुरावे गोळा करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close