शाशकीय

कस्तुरचंद पार्कवर आज होणार महाराष्ट्र दिन कार्यक्रम

Spread the love

 

पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

नागपूर, दि. 30- महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय समारंभ कस्तुरचंद पार्कवर उद्या 1 मे रोजी होणार आहे. सकाळी आठ वाजता पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, लोकप्रतिनिधी, माजी स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित असतील. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री श्री. फडणवीस विविध पथकांचे निरीक्षण करतील. पथसंचलनाचे नेतृत्व सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन थोरबोले करतील. सेकंड इन कमांडर राखीव पोलिस दलाचे उपनिरीक्षक संतोष गिरी असणार आहेत.
पथसंचलनात एकूण 13 पथके सहभागी होणार आहेत. यात नागपूर शहर पोलिस, राज्य आपत्ती प्रतिसाद पथक, नागपूर शहर महिला पोलिस, होमगार्ड (महिला), गृहरक्षक दल (होमगार्ड) आदी पथके सहभागी होणार आहेत. बक्षिस वितरण व नियुक्ती पत्रांचे वाटपही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सन 2021-22 मध्ये सशस्त्र सेना ध्वजनिधी उद्दिष्टापेक्षा जास्त निधी संकलन केल्याबद्दल जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित नागपूर शहर व ग्रामीण मधील व्यक्तींचा सन्मान,आदर्श तलाठी पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2018-19 आदी पुरस्कारांचे वाटप करण्यात येईल. यासोबतच पालकमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close