सामाजिक

धामणगाव विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादीचा दावा

Spread the love

 

शरदचंद्रजी पवार यांची माजी नगराध्यक्ष गणेश राय यांनी घेतली भेट

चांदुर रेल्वे (ता. प्र.) प्रकाश रंगारी

चांदुर रेल्वे : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून वर्धा लोकसभा मतदार संघ ओढून घेतल्यानंतर आता परत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे चांदुर रेल्वे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांनी पवारांची घेतली भेट येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुतारी चिन्हावर लढण्याची इच्छा प्रगट केली आहे.धामणगाव मतदार संघावर आपला हक्क सांगितला आहे. लोकसभा निवडणुकी वेळी वर्धा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रीय काँग्रेसचे अमोल काळे यांनी शरद पवार राष्ट्रवादी गटामध्ये प्रवेश घेऊन लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले या कारणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हर्ष उल्हास हो आपला प्रभाव वाढून त्यामुळे चांदुर रेल्वे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष श्री गणेश जी राय यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन धामणगाव विधानसभा मतदार संघाची उमेदवारी वर आपला हक्क दाखविला आहे गणेश राय यांनी सांगितले की 1994 ते2019 काँग्रेस पक्षाकडे होती. सन 1994 ते1999 व1999 ते2004 या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे हार झालेली होती. सन 2004 ते 2009 व 2009 ते 2014 व 2019 या निवडणुकीमध्ये लगातार तीन वेळा काँग्रेसने बाजी मारली होती. परंतु 2019 ते 2024 या निवडणुकीमध्ये भाजप चे प्रताप अडसड यांनी काँग्रेस उमेदवारांना पराजित केले. धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये 36 नांदगाव खंडेश्वर, धामणगाव, चांदुर रेल्वे या तीन तालुक्याचा समावेश आहे. यामध्ये एकूण पोलिंग बूथ 378 आहे. एकूण संख्या 3,09,159 आहे
लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी नेता शरद चंद्र पवार यांच्यावर विश्वास ठेवून अमर काळे यांना 13500 मतांची आघाडी घेऊन विजयी झाले यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये धामणगाव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी निवडणूक लढण्याच्या तयारी मध्ये आहे असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेता गणेश राय यांनी शरद पवार यांना निवेदन दिले आहे यामुळे मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close