सामाजिक

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या जनजागृती यात्रेचे वाडीत स्वागत व सभा

Spread the love

.
आंबेडकरी समाजामुळे ओबीसी से आरक्षण सुरक्षित!- शरद वानखेडे
*येणाऱ्या पिढी साठी ओबीसी ना जागरूक होण्याची गरज! राजू चौधरी
*7 दिवसीय जनजागृती यात्रेला दीक्षाभूमी हुन प्रारंभ!: वाडी(प्र) देशात 52% असलेल्या इतर मागासवर्ग समाजाचे हक्क, अधिकार, व आरक्षणा च्या जागृतीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने दीक्षाभूमी येथून निघालेली ओबीसी जनजागृती परिवर्तन रथाचे बुधवारी रात्री वाडीत आगमन झाले असता वाडीतील ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले.
* ओबीसींच्या न्याय हक्कासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाध्यक्ष राजू चौधरी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या परिवर्तन जनजागृती रथ यात्रेचे दत्तवाडी मंगलधाम सोसायटी परिसरात स्थानिक ओबीसी महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यां तर्फे भव्य स्वागत व जागृती सभा घेण्यात आली. प्रास्ताविकात विदर्भ उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघा चे प्रा.सुरेन्द्र मोरे यांनी ओबीसी समाजाची दिशा व दशा स्पष्ट करून या परिवर्तन यात्रेची गरज व महत्व स्पष्ट केले.
* या परिवर्तन रथा सोबत आलेले ओबीसी महासंघाचे तहसील,जिल्हा व राष्ट्रीय पदाधिकारी सुभाष घाटे,शरद वानखेडे, जि प सदस्य उजवला बोढारे,दिनेश बंग,कल्पना मानकर,अनिल चानपुरकर,ज्योती भोरकर,अमोल केदार,लीलाधर दाभे,विनायक इंगळे,रवी देशमुख यांचे सह माजी उपनगराध्यक्ष राजेश थोराने,अश्विन बैस,शैलेश थोराने,तेली समाज संघटनेचे अध्यक्ष अनिल बाजाईत,कामगार नेते अनंता भारसागडे,मोहन ठाकरे,पंकज फलके, राकेश काकडे रवींद्र सुरुजुसे,नरेंद्र राऊत,नाना गावंडे या सर्वांचे नागपूर तहसील अध्यक्ष अमित हुसनापुरे ,जिल्हा महासचिव योगेश चरडे, पूजा हुसनापुरे,यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
* उपस्थित जनसमुदायाला ,जिल्हाध्यक्ष राजू चौधरी,सुभाष घाटे,उजवला बोढारे,अनिल चानपुरकर,शरद वानखेडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की ओबीसी समाजची स्थिती गंभीर असून हा सँघर्ष येणाऱ्या पिढि साठी करीत आहोत. आज आम्हाला आरक्षणाचे महत्व समजत आहे.डॉ.आंबडेकर व भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी कलम 340 अन्वये ओबीसी समाजाला आरक्षण तरतूद केली. मात्र सवर्ण समाजाने आम्हाला हिंदू शब्दात अडकून आरक्षणाचे महत्त्व समजू दिले नाही.परिणामतः समाज सामाजिक,शैक्षणिक ,नौकरी क्षेत्रात मागास झाला. आंबेडकर समाजाच्या संघर्षाने लागू झालेल्या मंडल आयोग ज्यात ओबीसींना 27 टक्के आरक्षण आहे ,त्याचा विरोध आमच्या ओबीसींनीच केला, आंबेडकर समाजाने हा संघर्ष केला नसता तर आज ओबीसी समाज आहे त्या आरक्षणापासून ही वंचित राहिला असता. आंबेडकरी समाजमुळेच ओबीसीं चे आरक्षण सुरक्षित राहिले असे स्पष्टपणे नमूद करीत मराठा समाजाला महाराष्ट्रतील शिंदे -फडणवीस सरकारने जे नियमबाह्य व मागील दाराने आरक्षण दिले आहे त्याला थांबविण्याची गरज आहे.ओबीसी समाज विकास व जागृती साठी व संघाने हाक दिल्यास मैदानात उतरण्याची तयारी करण्या साठी ही संघर्ष यात्रा असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.सुरेंद्र मोरे यांनी तर आभार पूजा हूसनापुरे यांनी केले. या वेळी राकेश चौधरी, सुधाकर वानखेडे, वासुदेव आवारे ,मोहन वसुले,दिलीप काकडे ,अश्विन घोटेकर ,देवराव अखंड, श्रावण काकडे ,अरुण धोटे, नरेंद्र नानोटकर, लीलाधर भोयर, चंदू वैद्य ,निशा बांते ,मनोज बांते, श्रीराम सोनेकर, राजपूत, शेषराव उके,नत्थुजी वैद्य, इत्यादी सह कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरातील ओबीसी समाजातील नागरिक उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close