सामाजिक

दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळाची महत्वपूर्ण बैठक

Spread the love

 

बिलोली (प्रतिनिधी):
दिव्यांग, वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र जिल्हा,तालुका, सर्कल प्रमुख पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठक दि.१५ जुलै २०२४ रोजी सकाळी ११वाजता गणपती मंदिर सिडको नांदेड येथे आयोजित करण्यात येत आहे.
संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त व त्यांच्या अध्यक्षतेखाली खालील विषयांवर सविस्तर चर्चा करून क्रांती दिनी ९ ऑगस्ट २०२४ रोजी कोणते आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यासाठी व मुंबई मंत्रालय घेराव्यासाठी गेल्यानंतर आपणास शासन काय आश्वासन देईल, ग्रामपंचायत निधी, आमदार निधी, अनेक तालुक्यातील संजय गांधी ई. योजनेचे अनुदान मिळाले नाही अशा अनेक विषयांवर चर्चा करून सर्वानुमते निर्णय घेण्यासाठी सर्व पदाधिकारी वेळेवर ऊपस्थित राहावे, पावसाचे दिवस असल्यामुळे जाण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये याची सर्वांनी नोंद घ्यावी असे अवाहन दिव्यांग, वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्रचे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, जि. उपाध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार, जि. सचिव अनिल रामदिनवार सर्व जिल्हा पदाधिकारी सर्व ता.अध्यक्ष पदाधिकारी यांनी केले.
असे प्रसिध्दी दिव्यांग, वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र जिल्हा नांदेडच्या वतीने करण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close