जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
*५३हजारांचा मुद्देमाल जप्त*
*सहा जणांवर गुन्हा दाखल*
लाखनी:- शहरातील दत्तमंदिर परिसरातील मागील बाजूस सार्वजनिक ठिकाणी ५२ तासपत्तीवर पैश्याची बाजी लावून तीन पत्तीचा हार-जीत खेळ सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर लाखनी पोलिसांनी
दि.२७ ऑगस्ट रोजी छापा टाकत सहा जणांवर कारवाई केली आहे.
लाखनी तालुक्यातील दत्तमंदिर शिवारात मोकळ्या जागेत काही लोक तीनपत्तीचा जुगार खेळत होते. याची माहिती लाखनी पोलिसांना मिळाली. यावरून त्यांच्या पथकाने दत्तमंदिर शिवारात धाड टाकून सहा जुगारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोकड असा एकूण ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.जुगार खेळत असलेले संजय किसन हटवार,अजय दुर्योधन श्यामकुवर,उमेश रमेश श्रीरसागर,राहुल रमेश हटनागर, संजय लक्ष्मन नंदागवळी,अक्षय बबन निर्वाण असे आरोपीतांची नावे असून, सर्व आरोपी लाखनी येथील विविध भागातील रहिवासी आहेत.पोलिस शिपाई संदेश कानतोडे यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ )नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे करीत आहेत.