Uncategorized

हायप्रोफाइल se… रॅकेट चा पर्दाफाश ; चार अभीनेत्रींची सुटका 

Spread the love
 अरोरा नामक दलालास अटक 
 

मुंबई / नवप्रहार ब्युरो 


                   चित्रपट सृष्टीत करिअर घडवण्यासाठी आलेल्या परंतु काम n मिळाल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या अभिनेत्रींना एका व्यक्तीने वेश्याव्यसात गुंतवल्याचा खळबजनक प्रकार समोर आलं आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका हॉटेल वर धाड टाकून या चार अभिनेत्रींची सुटका केली आहे. दलाल श्याम सुंदर अरोरा याला अटक केली आहे. यातील एका अभिनेत्रीने हिंदी सीरियल मध्ये काम केले असल्याचे समोर आले आहे.
मुंबई पोलिसांनी शुक्रवारी शहरातील पवई भागात छापेमारी करत वेश्याव्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी एका हॉटेलमधून चार महिला अभिनेत्रींची सुटका केली. पवई पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

वेश्या व्यवसायात गुंतलेल्या एका अभिनेत्रीनं हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी चारही अभिनेत्रींची सुटका केली असून रॅकेट चालवणाऱ्या दलालाला अटक केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
छापेमारी करणाऱ्या पथकातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, मुंबईच्या पवई भागातील एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती आम्हाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आम्ही हॉटेलमध्ये सापळा रचला आणि महिला अभिनेत्रींना वेश्याव्यवसायात ढकलल्याबद्दल श्याम सुंदर अरोरा नावाच्या एका पुरूषाला अटक केली.
             या चारही अभिनेत्री चित्रपट सृष्टीत काम मिळवण्यासाठी धडपडत होत्या. हाताला काम नसल्याने त्या आर्थिक अडचणीत होत्या. या गोष्टीचा गैरफायदा घेत त्यांना वेश्याव्यवसाय आणले होते. पवई पोलिसांनी आरोपी अरोरा आणि त्याच्या एका साथीदारा विरोधात बीएनएस आणि अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक केली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close