पोलीस स्टेशन ब्राम्हणवाडा थडी येथील नवनियुक्त ठाणेदार उल्हास राठोड यांची अवैध धंदयावर धडक कार्यवाही
प्रतिनिधी मुबीन शेख.
शिरजगाव कसबा
अमरावती जिल्ह्यात येणारे चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशन चे नवनियुक्त ठाणेदार उल्हास राठोड यांचे आगमन होताच अवैध धंदा करणाऱ्या विरूदध धडक कार्यवाही करण्यात येत आहे. अवैध रित्या विनापरवाना दारू विक्री करणा-याचे विरूध्द व जुगार खेळणा-यांविरूध्द विशेष मोहीम राबविण्याचे आदेश ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशनला प्राप्त होताच ठाणेदार उल्हास राठोड यांनी त्यांचे अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना विशेष मोहीम राबविण्याचे आदेशित करून मोहीम प्रभावीपणे राबवुन घेतली व त्यामुळे दारू विक्री करणारे, गावठी दारूची वाहतुक करणारे व जुगार खेळ खेळणारे यांचेवर मोठ्या प्रमानात आळा बसला आहे. ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार उल्हास राठोड यांचे मार्गदर्शनात दारू विक्री करणारे, गावठी दारूची वाहतुक करणारे व जुगार खेळ खेळणा-यांच्या विरूध्द विषेश मोहीम राबवुन येत आहे. तसेच महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अंतर्गत दि ०३/०६/ २०२३ रोजी गावठी हात भटटीची दारू वाहतुक करणा-यांविरूध्द एक गुन्हा दाखल करण्यात आला असुन २ पुरुष आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीच्या ताब्यातुन १ मोटार सायकल किं अं ४००००/- रू व ४० लिटर गावठी हात भटटीची दारू किंअ ४०००/- रू असा एकुन ४४०००/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. दि ३०/०५/२०२३ रोजी ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशनला ठाणेदार उल्हास राठोड यांचे आगमन होताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांनी महाराष्ट्र दारू बंदी अधिनीयम अंतर्गत ०६ गुन्हे दाखल करण्यात आले व ईतरही कार्यवाही करण्यात आली आहे.
ब्राम्हणवाडा थडी पोलीसांनी केलेल्या धडक कार्यवाही मुळे अवैध धंदयावर मोठया प्रमानात आळा बसला असुन गावा मध्ये शांतता व सुव्यवस्थेचे वातावरण दिसुन येत आहे. पोलीसांनी अवैध धंदे करना या विरूध्द केलेल्या कार्यवाहीचे सर्व स्थरावरून कौतुक होत असुन नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. गावात कोठेही अवैध धंदे होत असल्यास नागरीकांनी पोलीसांना तात्काळ कळवावे असे आव्हान ब्राम्हणवाडा थडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार उल्हास राठोड यांनी केले आहे.
सदरची कार्यवाही. मा.उल्हास राठोड ठाणेदार पोलीस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी यांचे मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल मिठाराम दहिकर, राजु मरसकोल्हे, अनुप मानकर, शरद जनबंधु यांनी केली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मिठाराम दहिकर करीत आहे.