भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी सुधिर गोळे यांची पुन्हा निवड
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
: नुकतीच भाजपा किसान मोर्चा आघाडीची जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली. भाजपा जिल्हाध्यक्ष मा. खा. डॉ अनिलजी बोंडे यांच्या उपस्थितीत पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देवून अभिनंदन करण्यात आले.
हतोडा येथील ग्रा.प. सदस्य श्री सुधिर गोळे यांची भाजपा किसान मोर्चा आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. सुधिर गोळे यांनी अंजनगाव सुर्जी भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी असताना शेतकन्यांचे वेगवेगळे प्रश्न होवून कधी आंदोलन तर कधी निवेदन देवून सोडवले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करून आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळली. याची दखल घेवून पक्षाने त्यांना परत त्यांची जिल्हा कार्यकारीणीमध्ये निवड केली. सर्वसामान्यांच्या नेतृत्व, व प्रेमळ नम्रता असलेले नेतृत्व म्हणून ते परिचीत आहेत. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष मा. खा. डॉ अनिलजी बोंडे भाजपा पदाधिकारी व नवनियुक्त सदस्य उपस्थित होते