गुणवंत सव्वालाखे यांनी टेबल टेनिसच्या कास्यपदकावर कोरले नाव
आर्वी / प्रतिनिधी
नुकत्याच बालेवाडी पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात पार पडलेल्या उर्जा विभागाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रितेश गुणवंत सव्वालाखे यांनी कास्यपदक पटकाविल्याने, त्यांच्यावर क्रीडा क्षेत्रातुन अभिनंदनाचा व कौतुकाचा प्रचंड वर्षाव होत आहेत. तीन दिवसीय स्पर्धामध्ये “टेबल-टेनिस”या विशेष क्रीडा प्रकारात नागपूर येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता श्री *रितेश गुणवंत सव्वालाखे* यांनी महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करुन, आपल्या क्रीडा नैपुण्याचे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन केले आहेत.
..विशेषतः त्यांनी तेलगंणा व टाटा पावरच्या संघावर दणदणीत मात करित कास्यपदक प्राप्त केले आहेत. किंबहुना त्यांनी वैयक्तिक व.दुहेरी व सांघिक अशा तिनही प्रकारात यश संपादित केले. या स्पर्धेत भारतातील सर्वच राज्यामधिल उर्जा विभागात कार्यरत खेळाडू सहभागी झाले होते. तसेच पारितोषिक वितरण समारंभात उर्जा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या. हस्ते विजेत्यासह रितेश भाऊ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रात त्यांनी मानाचा तुरा रोवुन खेळाप्रती आपण जागृत राहुन, दैनंदिन जीवनात खेळाला प्राधान्य द्यायला पाहिजे, असेही सांगितले. भविष्य कालिन वाटचालिसाठी टाके परिवाराकडून तुम्हाला खूप शुभेच्छा. उत्तरोत्तर-उत्तर. प्रगती करून यशाची शिखरे पादाक्रांत करावी, अशा शुभेच्छा तुम्हाला देतो.
🎄🎄🎄🌹🌹🎄🎄🎄🎊🎊🎊🌹🌹🎊🎊🎊