शाशकीय

चांदुर रेल्वे पोलीस स्टेशनच्या आरोपीचा , अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मृत्यू

Spread the love

 

# पोलिसांनीच माझ्या मुलाला मारल्याचा आईचा आरोप

*चांदुर रेल्वे (ता.प्र.) प्रकाश रंगारी*
(अमरावती) जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आरोपीचा मृत्यू.मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रितेश अशोकराव मेश्राम राहणार मिलिंद नगर चांदुर रेल्वे, यांना धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी त्यांच्यावर चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये 353 कलाम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्यांची जमानातीवर सुटका झाली होती. त्यानंतर तो तारखेवर दोनदा गैरहजर असल्यामुळे त्याचा वॉरंट निघाला होता. त्याला रात्री बाराच्या सुमारास अटक करून चांदुर रेल्वे पोलीस यांनी पोलीस स्टेशनला नेले. त्यानंतर त्याला सेंटर जेल येथे रवाना करण्यात आले. सेंट्रल जेलमध्ये रितेश अशोकराव मेश्राम यांची प्रकृती ठीक नव्हती. म्हणून त्यांना सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु इलाजा दरम्यान रितेश अशोकराव मेश्राम यांचा मृत्यू झाला.
रितेशच्या आईचा असा आरोप आहे की. मी जमानतीचे कागद घेऊन गेले असता, मला पोलिसांनी माझ्या मुलाला भेटू दिले नाही. माझ्या मुलाला पोलिसांनीच मारले म्हणून त्याचा मृत्यू झाला. असा गंभीर आरोप आरोपीच्या आईने केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close