क्राइम

मुलीची हत्या करून त्याने आत्महत्या केल्याचा रचला बनाव पण……

Spread the love
शवविच्छेदन अहवालातून सगळेच स्पष्ट झाले.
दारव्हा ( यवतमाळ) / विशेष प्रतिनिधी
          अचानक शेतातून घरी परतलेल्या वडिलांना मुलगी घराच्या दारात उभी दिसली. त्यांनी घरात प्रवेश करताच अल्पवयीन मुलगा आणि मुलीने घरातून पळ काढला. ते कोण ? असे त्यांनी आपल्या मुलीला विचारले असता तिने त्यांना भेटायला आपल्या घरची खोली दिली असे सांगितल्यावर त्याचा पारा चढला. त्याने रागात मुलीचा गळा दाबला. त्यात तिचा जीव गेला. त्यानंतर त्याने मुलीचा मृतदेह गोठ्यात नेऊन फासावर लटकवा. जणू तिने फाशी घेऊन आत्महत्या केली असे सगळ्यांना वाटावे. पण शवविच्छेदन अहवालातून सगळे काही स्पष्ट झाले. आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
 ही घटना सोमवारी (ता. 13) दुपारी चार वाजताच्या तालुक्यातील फुबगाव येथे घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने बुधवारी (ता.15) तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
मयूरी विजय राऊत (वय 17) असे मृत मुलीचे नाव आहे. तर विजय केशवराव राऊत (वय 45) असे आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी आरोपी पत्नीसह शेतावर गेला होता. मुलगी एकटीच घरी होती. आरोपी दुपारी एकटाच घरी परतला तेव्हा मुलगी दारात उभी होती. आणि आतमध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि मुलगी असल्याचे त्याला दिसले.
आरोपीला पाहताच त्यांनी पळ काढला. या प्रकाराबाबत चौकशी केली तेव्हा, मुलीने त्यांना भेटायला आपल्या घरची खोली दिल्याचे समजल्यानंतर त्याचा पारा चढला. रागाच्या भरात त्याने मुलीचा गळा दाबला. त्यावेळी तिचा श्वास रोखला गेल्याने मृत्यू झाला. त्यानंतर आपले बिंग फुटू नये म्हणून त्यांनी मृतदेह गोठ्यात नेऊन दोरीने लटकवून ठेवला आणि मुलीने फाशी घेतल्याचा बनाव केला.
परंतु, मृतदेहाच्या शवविच्छेदन यादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला अभिप्राय व पोलिस तपासात ही घटना उघडकीस आली. त्यानंतर छाया विजय राऊत (वयच 40) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे, ठाणेदार सुनील गोपीनवार, पीएसआय नीलेश तारक, पीएसआय संभाजी हिवाळे व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close