राजकिय

गोंदियात राष्ट्रवादीला खिंडार ; नगराध्यक्ष आणि नगरसेवक शिंदे खेम्यात दाखल

Spread the love

गोंदिया / विशेष प्रतिनिधी

             कर्नाटक राज्यात काँग्रेस ला मिळालेल्या यशमुळे राज्यात काँग्रेस ला नवीन उभारी मिळाली आहे. फक्त काँग्रेसच नाही तर महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष या विजयामुळे हर्षित झाले आहेत. यानंतर त्यांनी राज्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढण्यासाठी मिटिंगस घेणे सुरू केले आहे. राज्यात महाविकास आघाडीने अनेक ठिकाणी वज्रमुठ सभेचे आयोजन देखील केले आहे. पण असे असतांना भाजपा आणि शिंदे गटाने राष्ट्रवादीला सुरुंग लावण्याचे काम सुरू केले आहे.

राष्ट्रवादीच्या गोंदियातील दोन नगराध्यक्षांनी आणि तब्बल पंधरा नगरसेवकांनी शिवसनेते प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित ठाण्यातील निवासस्थानी हा पक्ष प्रवेश पार पडला आहे. मगील काही दिवसांपासून मविआला खिळखिळी करण्याचे काम भाजप आणि शिवसेना करत आहे. अशातच हा प्रवेश राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार आहे.

मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अशोक टेकवडे यांनी घड्याळ सोडून कमळ हाती घेतलं. अशोक टेकवडे हे 2004 ते 2009 दरम्यान पुरंदर हवेलीचे आमदार राहिले आहेत. भाजप कडून राष्ट्रवादीचा गड जिंकण्यासाठी मिशन बारामती आखण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर टेकवडेंचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का बसला आहे.

राज्याच मविआ आणि भाजप-शिवसेनेने लोकसभेसाठी कंबर कसली आहे. यासोबतच आता भाजप-शिवसेना महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरु आहे.

गुरुवारी शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत भाजप २६ आणि शिवसेना २२ असा फॉम्युला ठरला असल्याचे समजते. ही प्राथमिक चर्चा झाली आहे.

यानंतर अजून बैठक होऊन जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close