क्राइम

गो-मास विक्री करणारा व गोवंश कतलीसाठी घेवुन जाणारे ४ आरोपी गजाआड

Spread the love

 

वेगवेगळ्या जागी करण्यात आल्या कारवाया.

वरूड/तूषार अकर्ते

शेंदूरजनाघाट शहरातील मलकापूर भागातील कुरेशीपुरा येथे गेल्या कित्येक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गोमास विक्री होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा होती.परंतु पोलिसांना या बाबत ठोस पुरावे हाती लागत नसल्याने पोलिसांचे या कडे दुर्लक्ष होत होते.मात्र दि.२५ जुन रोजी मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी ७ वाजता च्या दरम्यान या भागात रेड केली असता प्लॉस्टिकच्या लहान ड्राम मधुन १४,५०० रूपयांचे ७० किलो गो-मास ताब्यात घेत आरोपी इफतेखार अहमद शेख चालु कुरेशी (४४) रा.शे.घाट याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दि.२५ जुन रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजता च्या दरम्यान वाई ते मलकापूर रस्त्यावरील मुस्लीम कब्रस्तान जवळ पोलिसांनी नाकाबंदी केली असता उबेदुर रहमान रफिक अहमद कुरेशी (३३) रा.शे.घाट हा १८,००० रूपायांच्या दोन गाई दोरीने निरदयतेने बांधून कत्तली करता पायदळ घेऊन जात असताना मिळून आला होता.
दि.२७ जुन रोजी सायंकाळी ५ वाजता बालापेठ ते वरूड रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान प्रफुल्ल ओंकार जोगेकर (२५) रा.शे.घाट हा टाटा एक्स वाहन क्रमांक एम एच ३१ सि क्यु ७६०२ मध्ये गोरा जातीचे १ गोवंश दौराने निर्दयतेन बांधून वाहनात कोबुंन वाहतुक करताना मिळून आल्याने आरोपीचे ताब्यातुन एक गोरा व वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकून १ लक्ष ८ हजार रूपायांचा माल जप्त करण्यात आला.
तसेच दि.२७ जुन रात्री ९ वाजता च्या दरम्यान वाई ते मलकापूर रस्त्यावरील मुस्लीम कब्रस्तान जवळ नाकाबंदी केली असता अब्दुल हलीम रफिक अहमद कुरेशी (४२) रा.शे.घाट हा सात बैलाना निर्देयतेने ऐकमेकांचे मानेला दोरीने बांधुन अवैध रित्या पायदळ कतली करीता घेवून जात असताना पोलिसांना मिळुन आला असता त्यांच्या ताब्यातून एकुन १ लक्ष २५ हजार रुपयांचे ७ बैल जातीचे गोवंश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चारही प्रकरणातील ४ आरोपीतांकडुन एकुन २ लक्ष ६९ हजार ५०० रूपायांचा मुद्देमाल जप्त करत यांच्या विरूद्ध प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदरील कारवाई शें.घाटचे ठानेदार सतीश इंगळे यांच्या आदेशाने कुंदन मूधोळकर, विष्णु पवार, संदीप वानखड़े, वीरेंद्र अमृतकर, मोहन महाजन, सागर लेवहरकर, अक्षय खराटे, मदन उइके, उमेश कुंभेकर, महेश बारबुधे, वसीम शेख यांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close