शाशकीय

गाडीवर झाड कोसळले ;  पीएसआय आणि चालकाचा जागीच मृत्यू 

Spread the love

पोलीस दलात खळबळ 

                        प्रकरणाच्या चौकशी साठी गेलेल्या पोलीस दलाच्या वाहनावर झाड कोसळल्याने झालेल्या अपघातात दलातील पीएसआय आणि चालकाचा मृत्यू झाला आहे तर तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने पोलीस दलात खळबळ माजली आहे. 

            मिळालेल्या माहिती नुसार आर्थिक गुन्हे शाखेची टीम एरंडोल – कासोदाकडे एका प्रकरणाची चौकशी करण्याकरिता जात असताना अंजनी धरणाजवळ त्यांच्या चालत्या वाहनावर झाड कोसळल्याने हा अपघात झाल्याचे समजत आहे.घटना रात्री  9 च्या सुमारास घडली. यात पीएसआय आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

या अपघाताची घटना समोर आल्यानंतर कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले. अंजनी धरणालगत ही दुर्घटना घडली आहे. स्थानिकांकडून या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे

या अपघातात गाडीमधील इतर तीन कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले.अंजनी धरणालगत ही दुर्घटना घडली आहे.

या अपघातात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी हे दोन्ही जागेवरच ठार झाले आहेत. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणाच्या तपासासाठी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close