आरोग्य सेवकाचा सेविकेवर अत्याचार

व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंगच्या प्रयत्नाचा आरोप
लाखांदूर..आरोग्य विभागतर्गत आरोग्य केंद्रात आरोग्य सेवकांने उपकेंद्रातीलच एका आरोग्यसेविकेवर अत्याचार व विनयभंग केल्याची घटना घडली.या घटनेतील पीडित आरोग्य सेविकेच्या तक्रारीवरून जितेंद्र लिंगाजी रायपुरे (४४)नामक आरोग्य सेवकांविरोधात अत्याचार व विनयभंगाची विविध कलमअनंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.११ऑक्टोबर रोजी घटना उघडकीस आली.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार,घटनेतील पीडित आरोग्य सेविका व आरोग्य सेवक मागील ३वर्षांपासून तालुक्यातील एकाच आरोग्य उपकेंद्रात कार्यरत आहेत.एकाच उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेवकांने मागील दोन वर्षांपूर्वी आरोग्य सेविकेच्या तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला.त्या घटनेच्यावेळी आरोग्य सेविकेच्या अशशील व्हिडिओ मोबाइलमध्ये चित्रित केले होते.ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.यामुळे तिने या घटनेची माहिती स्वतःच्या कुटुंबियांना देऊन लाखांदूर पोलिसात तक्रार दिली.तक्रारीवरून ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदरसनात घटनेचा पंचनामा करून आरोपीविरोधात विविध कलमनतेर्गत गुन्हा नोंद केला.पुढील तपास सुरु आहे.