क्राइम

लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षण संचालकाला अटक

Spread the love

शिक्षण शुल्क परत करण्यासाठी पालकांचे ठिय्या आंदोलन 

पिंपरी चिंचवड / नवप्रहार मीडिया 

             विद्यार्थिनी लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसानी त्या शैक्षणिक संस्था चालकाला अटक केली आहे. तर या अकॅदमित  प्रवेश घेतलेल्या पाल्यांचे शिक्षण शुल्क परत करावे यासाठी पालकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेआहे.

या अकादमीत राज्यातील वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत होते. विद्यार्थ्यांच्या पालकांनी कर्ज काढून तर कुणी शेत जमीन विकून लाखो रुपये शैक्षणिक शुल्क म्हणून अकादमीत जमा केले आहेत.

या अकादमीच्या संचालकाला अटक झाल्याने जानेवारी महिन्यापासून अकादमी बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे. या बराेबरच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क देखील बुडाल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्था साेडल्याचा दाखला मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना इतर स्कूल किंवा महाविद्यालयात प्रवेश देखील मिळन नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झालं आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त प्रशासनाने तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क परत मिळवून देण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close