सीमा हैदर युपी एटीएस च्या ताब्यात
पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय
नवी दिल्ली / नवप्रहार वृत्तसेवा
आपल्या चार मुलांसह प्रियकाराकडे आलेल्या सीमा हैदर बाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. तिचे काका सैन्यात सुभेदार असून भाऊ सैन्यात सैनिक आहे. पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय आहे. इंटेलिजन्स ब्युरोने दिलेल्या अहवालाच्या आधारे यूपी एटीएसने सीमाला ताब्यात घेतले आहे.
: आपल्या ४ मुलांसह पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदर प्रकरणात आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. प्रेमाच्या बहाण्याने भारतात आलेला सीमा हैदर ही पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय आहे. इंटेलिजन्स ब्युरोने दिलेल्या अहवालाच्या आधारे यूपी एटीएसने सीमाला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर आता तिची चौकशी सुरू आहे. सीमा हैदरशिवाय सचिन मीना आणि त्याचे वडील नेत्रपाल यांनाही एटीएसने ताब्यात घेतले आहे.
सीमाची ओळखपत्रे उच्चायुक्तांना पाठवण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सीमाचे काका पाकिस्तानी लष्करात सुभेदार असून तिचा भाऊ पाकिस्तानी सैनिक आहे. भारताची सुरक्षा एजन्सी आता सीमाची चौकशी करणार आहे. एटीएस पथकाद्वारे सीमाच्या लव्हस्टोरीपासून तर भारतात येण्यापर्यंच्या सर्व बाबींवर चौकशी केली जात आहे.
उत्तर प्रदेशातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सीमा ही पाकिस्तानी नागरिक आहे आणि ती भारतात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा परिस्थितीत तिची चौकशी करणे आवश्यक आहे. देशाच्या सुरक्षेशी निगडित अशा सर्व यंत्रणा तिची चौकशी करतील.
लॉकडाऊनच्या काळात २०१९ मध्ये सीमा आणि सचिन पबजी गेम खेळताना एकमेकांच्या संपर्कात आले. यानंतर त्यांच्यात ओळख झाली आणि ओळखीच रुपांतर प्रेमात झाले. दरम्यान, १३ मे २०१३ रोजी सीमा हैदर नेपाळमार्गे बसने भारतात आली. सचिन ग्रेटर नोएडाच्या रबुपुरा भागात राहायला आहे. सीमा देखील त्याच्यासोबत राहते. सचिन दुकान चालक आहे. व्हिसाशिवाय नेपाळमार्गे चार मुलांसह बेकादेशीरपणे भारतात प्रवेश केल्याप्रकरणी सीमाला पोलिसांनी ४ जुलै रोजी अटक केली. याचबरोबर एका अवैध निर्वासिताला आश्रय दिल्याच्या आरोपावरून सचिनची तुरुंगात रवानगी करण्यात आली. यानंतर दोघांची सुटका करण्यात आली. मात्र, उत्तर प्रदेश एटीएसने सीमाला चौकशीसाठी पुन्हा ताब्यात घेतले आहे.