क्राइम

वंडली येथे दुहेरी हत्याकांड ; दारुड्या जावयाने सासू व साळ्याची केली हत्या 

Spread the love
हत्येनंतर दोन्ही मृतदेह पेट्रोल टाकून जाळले
त्यानंतर  अंगावर पेट्रोल टाकून घेत स्वतःला जाळले
घटनेची माहिती होताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी
वृध्येला वाचविण्यात नागरिकांना यश 
मोर्शी (अमरावती )/ संजय गारपवार 
                जिल्ह्यातील बेनोडा पोलीस स्टेशन च्या हद्दीतील वंडली गावात नात्याला काळिमा फासणारा आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. या गावचा जावई असलेल्या व्यक्तीने आपल्या सासू आणि साळ्याची हत्या करुन त्यांच्या मृतदेहा वर पेट्रोल टाकून जाळून दिल्याची घटना घडली आहे. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतःला ही जाळून घेतले आहे. आशिष ठाकरे असे त्या जावयाचे नाव आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
           नागरिकांत सुरू असलेल्या चर्चेनुसार  आशिष ची बायको माहेरी आल्याने तो बायको वर नाराज होता. काल तो बेनोडा येथे पोहचला. आणि त्याने साळा प्रणय भोंडे आणि सासू लता भोंडे यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह पेट्रोल टाकून जाळून टाकले. आणि स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतःला ला जाळून घेतले.
आशिष चा झाला होता प्रेमविवाह – सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार आशिष चा वंडली येथील रहिवासी लताबाई यांच्या मुलीसोबत आशीष ने प्रेमविवाह केला होता. पण तो दायु पिऊन मुलीला मारझोड करीत असल्याने आशिष ची बायको   3 महिन्या पासून माहेरी येऊन राहू लागली होती. आशिष वारंवार बायकोला परत येण्यास सांगत होता.
संतापलेला नवरा थेट पोहचला सासुरवाडीत – घटनेच्या दिवशी आशिष ने आपल्या एका मित्राला वंडली येथे सोडून मागितले. त्याने त्याच्या मित्राच्या दुचाकीत पेट्रोल भरले. आणि प्लास्टिक च्या खाली बॉटल मध्ये पेट्रोल घेतले आणि तो वंडली साठी निघाला.
मागच्या खोलीत झोपली असल्याने वृद्धा बचावली-। पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मृत लताबाई भोंडे आपल्या सासू नामे चंद्रकला भोंडे (90)  आणि मुलगा प्रणय (22) सोबत राहत होती. सासू चंद्रकला मागच्या खोलीत झोपली असल्याने आणि तिने आरडाओरड केल्याने गावकरी जमा झाले. त्यांनी झोपडीच्या मागील बाजूचे तुराटीचे कुड तोडून चंद्रकला बाई हिला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर गावकऱ्यांना आतील खोलीत तीन मृतदेह दिसले.
बायको राजुरा बाजार येथे असल्याने वाचली – आशिष बायको वंडली येथे माहेरी आल्यानंतर देखील तिला तेथे येऊन त्रास देत असल्याने लताबाई यांनी तिला तिच्या मावशीच्या येथे राजुरा बाजार येथे पाठवून दिले होते.
मावस सासऱ्याला फोन वर कॉल करुन दिली माहिती –  आशिष ने दोघांची हत्या केल्यावर मावस सासरे दिनेश निकम यांच्या मोबाईल वर कॉल करून सासू लताबाई आणि साळा प्रणय याला ठार मारल्याची माहिती दिली.
आशिष च्या कागदपत्रांवरून ओळख पटली – घटनास्थळी आशिष ची बॅग, जॅकेट, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे मिळाल्याने घटनास्थळी आशिष असल्याची खात्री पटली.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close