राजकिय

समीर भुजबळ शरद पवारांच्या राष्ट्रवादी च्या  वाटेवर

Spread the love

मुंबई / नवप्रहार डेस्क 

                     विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाल्यावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी साठी इच्छुक असलेल्या आणि आहे त्या पक्षात उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने अनेक इच्छुक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश घेण्यासाठी फिल्डिंग लावत असल्याचे पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ यांचे सुपुत्र समीर भुजबळ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलल्यज जात आहे.असे झाल्यास हा अजित पवारां साठी मोठा धक्का मानला जात आहे.

किंवा ते अपक्ष निवडणूक देखील लढू शकतात अशी चर्चा सुरू आहे. समीर भुजबळ हे नांदगावमधून निवडणूक लढववण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र हा मतदारसंघ सध्या शिवसेनेकडे आहे. शिवसेना नेते सुहास कांदे यांना इथून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातून समीर भुजबळ यांना उमेदवारी मिळणार नाही.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समीर भुजबळ हे नांदगावमधून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. मात्र हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेचा असल्यामुळे समीर भुजबळ यांच्याकडून वेगळ्या पर्यायाची चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. समीर भुजबळ हे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. समीर भुजबळ हे एकतर तुतारी हाती घेणार किंवा अपक्ष निवडणूक लढवणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला होता, अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मात्र जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीला लोकसभेत मोठं यश मिळालं. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांना कोणत्या आणि किती जागा मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

उमेदवारांची यादी प्रसिद्धी होण्यापूर्वीच अनेक इच्छूक हे नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा इच्छूकांच्या नाराजीचा फटका हा महायुती आणि महाविकास आघाडी असा दोन्हीकडे देखील बसू शकतो. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ही बंडखोरी टाळण्याचं मोठं आव्हान राजकीय पक्षांपुढे असणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close