जुनी पेंशन च्या मागणीसाठी पुसद येथे कर्मचाऱ्यांची बाईक रॅली संपन्न
जुनी पेंशन साठी कर्मचाऱ्यांचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.
राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी
जुनी पेंशनच्या बाईक रॅलीत सर्व विभागाचे,हजारो कर्मचारी सामील.
*आज पुसद येथे झालेल्या पेंशन बाईक रॅलीत सर्व विभागाचे राज्य सरकारी कर्मचारी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पेंशन हा विषय आता कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वाचा आणि निवृत्तीनंतर सन्मानाने जगण्याचा प्रश्न बनला आहे.३५/४० वर्ष शासनाची सेवा केल्याने निवृत्ती नंतर स्वाभिमानाने जगता यावे ह्यासाठी जुनी पेंशन योजना लागू आहे.परंतु शासनाने १ नोव्हेंबर २००५ पासून जुनी पेंशन योजना बंद केली आहे,त्या ऐवजी शाश्वती नसलेली नवीन पेंशन योजना लागू केली आहे.*
राज्यातील कर्मचारी बऱ्याच वर्षांपासून जुनी पेंशन ची मागणी करत आहेत.ह्याच मागणी साठी संपूर्ण राज्यातील जवळपास १८ लाख कर्मचारी दि १४ मार्च २०२३ ते दि २० मार्च २०२३ ह्याकाळात बेमुदत संपावर सुद्धा गेले होते.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची समजूत काढून संपावर तोडगा काढण्यासाठी जुनी पेंशन प्रमाणेच कर्मचाऱ्यांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी एक समिती गठीत केलेली हाती.पेंशन संदर्भात आपला अहवाल सादर करण्यासाठी समितीला ३ महिन्याचा कालावधी देण्यात आला होता.परंतु नियोजित कालावधीत समिती आपला अहवाल शासनास सादर करू न शकल्याने समितीला पुन्हा मुदत वाढ देण्यात आली.ह्यातून शासनाचे वेळ खाऊ धोरण असल्याची कर्मचारी यांची भावना असल्याने आता राज्यसरकारी कर्मचारी पुन्हा आंदोलन करण्यासाठी तयार आहेत.जुनी पेंशन ह्या मागणी साठी पुसद सर्व सरकारी कर्मचारी समन्वय समिती मार्फत आज दि ०९/०८/२०२३ रोजी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बाईक रॅली साठी कर्मचाऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.अखेर मा.उपविभागीय अधिकारी श्री काळबंडे साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.श्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन आजच्या बाईक रॅलीची सांगता करण्यात आली.
*आजच्या बाईक रॅली साठी श्री दिलीप कोलेवाड,श्री. दिपक भवरे श्री. मधुकर मोरझडे,श्री शद्बोधन कांबळे, श्री अभिजित नवलकर,श्री अभिजित पाटील,श्री अनिल दुम्हारे ,श्री संजय मस्के,श्री रणधीर आडे,श्री दिलीप पवार,श्री भाऊचंद चव्हाण,श्री मंगेश टिकार,श्री नागेश जोगदे ,श्री लिगाडे, श्री सुरेश राठोड, श्री जय राठोड, श्री सचिन दुपे, श्री सुरेश राठोड , यांच्या सह सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.*