लव्ह जिहाद ..गुंगीचे औषध देऊन अपहरण, धर्मपरिवर्तन आणि बलात्कार

लखनऊ / नवप्रहार डेस्क
युपी च्या बांदा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील सलीम नावाच्या मुस्लिम युवकाने हिंदू तरुणीला गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण करून मुंबईला नेले.तिथे तिचे धर्मपरिवर्तन करून तिच्याशी जबरदस्तीने लग्न लावले आणि त्यानंतर तिच्यावर बळजबळीने बलात्कार करण्यात आला. कुटुंबियांच्या तक्रारी नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तरुणीला मुंबई येथुन परत आणले. तरुणीच्या तक्रारी वरून शकील वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बांदा जिल्ह्यातील गिरवान पोलीस स्टेशन परिसरात घडली. येथे २० मे रोजी पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. महुआ गावातील शकील याने आपल्या मुलीला आधी दारू पाजून बेशुद्ध केले आणि नंतर तिचे अपहरण करून कोठेतरी नेले, असे पीडितेच्या कुटुंबियांनी तक्रारीत म्हटले आहे. शकीलसोबत त्याचे काही साथीदारही या अपहरणात सहभागी असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आयपीसी कलम ३६६ अंतर्गत एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. दरम्यान पीडित मुलगी मुंबईत सापडली. जेथून शकीललाही अटक करण्यात आले.
पीडितेला बांदा येथे आणून चौकशी करण्यात आली. मुलीने सांगितले की, २० मे रोजी शकीलने तिला गुंगीसारख्या पदार्थाचा वापर करून बेशुद्ध केले. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा पीडिता ट्रेनमध्ये होती. तिच्यासोबत शकीलही होता. तिने मदत मागितल्यास जीवे मारण्याची धमकी देत तो तिला मुंबईला घेऊन गेला. येथे मुलीला मशिदीत नेण्यात आले. पीडितेचे मशिदीत इस्लाम धर्म स्वीकारण्यात आले. या ठिकाणी मुलीचे नाव इकरा असे होते. यानंतर शकीलने पीडितेशी जबरदस्तीने लग्न करून तिच्यावर बलात्कार केला.
पीडित मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे पीडित कुटुंबीयांनी सांगितले. मुलीशी लग्न केल्यानंतर शकीलने तिचे फोटो आणि मॅरेज सर्टिफिकेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. विश्व हिंदू परिषदेने या घटनेला लव्ह जिहाद म्हणत प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पीडितेची सुटका झाल्यानंतर या प्रकरणात उत्तर प्रदेश धर्म परिवर्तन प्रतिबंध कायदा आणि बलात्काराच्या कलम ३७६ मध्ये वाढ करण्यात आली आहे. शकीलची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेतील अन्य आरोपींचा सहभाग तपासण्यात येत आहे.