अठरा वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग
श्रीनाथ विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न
मुख्याध्यापक व शिक्षकांची उपस्थिती
अंजनगाव सुर्जी -मनोहर मुरकुटे
अंजनगाव सुर्जी येथील लढढा कॅम्पस, महेश नगर मधील मानवसेवा पॅरामेडिकल कॉलेज मध्ये दि ६ नोव्हेंबर रोजी २००६ वर्षातील १०वी चा वर्ग एकत्र आला. यावेळी स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. १८ वर्षांनी एकत्र आलेल्या वर्गमित्रांनी यावेळी जुन्या आठवणीना उजाळा दिला.
दहावी नंतर पुढील उच्चशिक्षण व नंतर नोकरींनिमित्त एकमेकांपासून दूर गेलेले विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले. यातील अनेक विद्यार्थी मुंबई, पुणे, नागपूर, अकोला, अमरावती, गडचिरोली, बिहार, काश्मीर आदी ठिकाणी नोकरीं व व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. या सर्वांनी पुन्हा एकदा दिवाळीच्या सुट्टीचे औचित्य साधून भेटावे. याकरीता हे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा असल्याने मुख्याध्यापक व शिक्षकांना निमंत्रित करण्यात आले होते. सर्व शिक्षकांनी आपले मनोगत भाषणातून दिले.
बरेच शिक्षक व मुख्याध्यापक यांनी हजेरी लावत या भेटीचा आनंद द्विगुणित केला. शिक्षकांमध्ये अशोक पाठक सर, वासुदेव मेन सर, पुष्पाताई सावरकर मॅडम, कन्होपात्रा नेहर मॅडम, मनोहर चव्हाण सर, माजी मुख्याध्यापक गोविंद धमाले सर, यदुनाथ अतकरे सर, अशोक रायबोले सर आदी शिक्षण उपस्थित होते. यावेळी सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर पुन्हा भेटण्याचा संकल्प करून एकमेकांचा निरोप घेतला. माजी विद्यार्थ्यांमध्ये सचिन सुने, प्रताप बर्डे, अतुल बदुकले, गजानन पर्वत, रेश्मा नाठे, शीतल कोठेकर, शालिनी नेरकर, मेघा दातीर, श्रीकांत पळसपगार, डॉ नंदकिशोर पाटील, सतीश इंगळे, राहुल हागे, अमोल व्यवहारे, देवेंद्र कतोरे, गजानन रेखाते आदी माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित झाले. महत्वाचे म्हणजे काही वर्गमित्र सहपरिवार पती, पत्नी व मुलांसह उपस्थित झाले होते. तर काही वर्गमित्र पोलीस तथा सैन्य दलात रूजू आहेत, त्यांना सुट्टी मिळू शकली नसल्याने सोशल मिडियाच्या माध्यमातुन आनंद घेतला. मेळाव्याचे प्रास्ताविक रत्नशील रामटेके यांनी केले. सूत्रसंचलन डॉ नंदकिशोर पाटील यांनी केले तर आभार शालीनी नेरकर यांनी मानले. एकंदरीत स्नेहमेळाव्याचे आनंदात आयोजन संपन्न झाले.