क्राइम

दोन महिलांनी साथीदारांच्या मदतीने केली पुजाऱ्याची हत्या

Spread the love

कोरापुट (ओडिशा)/ नवप्रहार मीडिया 

                 ओडिशा राज्यातील कोरापूट जिल्ह्यात घडलेल्या घटनेने राज्यात खळबळ माजली आहे. येथे दोन महिलांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने ऐका 73 वर्षीय पुजऱ्याची हत्या केली आहे. घरात चोरीच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचे आरोपी महिलांनी पोलिसांना सांगितले आहे. पुजारी स्वतः वाचविण्यासाठी ओरडत असल्याने मारेकऱ्यांनी त्याच्या तोंडात बोळा कोबला होता असे त्यांनी  जबानीत सांगितले आहे.

रमेशचंद्र त्रिपाठी यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासकार्याला सुरुवात केली. त्रिपाठी यांच्या घरात काम करणाऱ्या दोन महिलांची पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर या प्रकरणाचा उलघडा झाला. यावेळी त्यांनी सांगितले की, आणखी काही साथीदारांच्या मदतीने आम्ही त्रिपाठी पुजाऱ्यांची हत्या केल्याचे त्यांनी कबूल केले. याप्रकरणी आता सरस्वती जानी (वय 20), रामा गौडा (21), प्रताप टाकरी (24), किशन बाग (20), नीरज बेनिया (21), महेंद्र पाणिग्रही (25) आणि अशोक रे (35) या आरोपींचा या प्रकरणात समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रमेश त्रिपाठी हे त्यांच्या घरी एकटेच राहत होते. हे त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलांना माहिती होते.त्यामुळे त्यांनी त्यांच्या साथीदारांसह पुजाऱ्याच्या घरातील मौल्यवान वस्तू लुटण्याचा त्यांनी कट रचला. घरातील किंमती वस्तू लुटण्यासाठी त्या दोन महिलांसह त्याचे साथीदार त्रिपाठींच्या घरात घुसले तेव्हा, त्यांनी मदतीसाठी आरडाओरडही केला. मात्र त्यांचा आवाज बाहेर जाऊ नये यासाठी त्या टोळीने त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा घातला होता. तर हालचाल करु नये यासाठी त्यांचे हातपायही बांधले होते, या सर्व प्रकारामुळे त्यांचा त्यामध्ये गुदमरुन मृत्यू झाला.

पुजाऱ्याची हत्या झाल्यानंतर आरोपींनी घरातील कपाटातील दागिने, पैसे घेऊन हे सगळे फरार झाले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करत आरोपींना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडून 15 हजार रुपये रोख, सोन्या-चांदीचे दागिने आणि 6 मोबाईल जप्त केले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close