अनाठायी खर्च टाळत वाढदिवसावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
पत्नीच्या वाढदिवसावर उपमुख्याधिक्कारी साळुंके यांचा स्तुत्य उपक्रम
भंडारा (प्रतिनिधी) :--वाढदिवसाचा खर्च नाहकपणे करून उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होवू शकतात. हा उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून तुमसर नगर पालिकेचे उपमुख्यधिकारी म्हणून कार्यरत असलेले सुनील साळुंके यांनी त्यांच्या पत्नी स्नेहल साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त तुमसर येथील नगर परिषदेच्या चिंतामण बिसने शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खावू वाटप केले.
शनिवारी (ता.१४) सुनील साळुंखे यांनी त्यांच्या पत्नीचा वाढदिवसानिमित्त नगर परिषद चिंतामण बिसने शाळेतील ४० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.त्यामध्ये ड्रॉईंग बुक,कलर,लिखाण पॅड व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी सुशांत आरु, अश्विनी आरु, निखिल बंड, किरण बंड, पूजा सावके,गजबे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद उपस्थित होते.