संभाजीनगरातून युवकाच्या घरातून ६६ इंचाची तलवार जप्त
राजेश सोनुने पुसद प्रतिनिधी
पुसद
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संभाजीनगर येथील मज्जिद जवळ राहणाऱ्या युवकाच्या घरून दि.२६ जूलै २०२३ रोजीच्या सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान तलवार जप्त केली आहे.तलवार बाळगणाऱ्या युवकाला देखील एलसीबीने ताब्यात घेतले आहे.युवकाविरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सरवर खान अजगर खान वय ३४ वर्षे रा.संभाजी नगर असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगर येथे राहणाऱ्या सरवर खान कडे मोठी तलवार असल्याची माहिती बस स्थानक परिसरात पेट्रोलिंग दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे,नापोका पंकज पातुरकर,पोलीस हवालदार तेजाब रणखांब व पोलीस शिपाई सुनील पंडागळे यांनी दि.२६ जुलै २०२३ रोजीच्या सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान घरावर धाड टाकली.धाडीत घरातून ६६ लांबीची तलवार जप्त केली आहे.सोबतच युवकाला देखील एलसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे.युवकाच्या घरी तलवार सापडल्याने संभाजीनगर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.