चार लोक बेपत्ता , सहा लोकांना वाचविण्यात यश
सुरेंद्रनगर ( गुजरात)/ नवप्रहार मीडिया
गुजरातच्या सुरेंद्रनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.येथे राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा पूल कोसळल्याने ट्रक सह अनेक वाहने नदीच्या पाण्यात पडली आहेत. पाण्यात पडलेल्या लोकांपैकी सहा लोकांना वाचविण्यात यश आले आहे. तर चार लोक बेपत्ता आहेत.
बेपत्ता लोकांना वाचविण्यासाठी बचाव मोहिम सुरु करण्यात आली आहे. बेपत्ता लोकांची शोधमोहिम सुरु आहे. सुरेंद्रनगर जिल्ह्यातील वस्ताडी गावाजवळ हा अपघात झाला. राष्ट्रीय महामार्गाला चुरायेथे जोडणारा पूल बांधण्यात आला होता. तो कोसळला आहे. पुलावरून जात असलेल्या ट्रक, मोटारसायकलसह अनेक वाहने नदीत पडली. त्यात प्रवास करणारे लोकही पाण्यात पडले.