राजकिय

पवार यांचे वक्तव्य बेजबाबदार आणि निषेधार्थ

Spread the love

पवार यांचे वक्तव्य बेजबाबदार आणि निषेधार्थ

वी दिल्ली / नवप्रहार मीडिया 

         शरद पवारांनी पॅलेस्टाईन समर्थनार्थ केलेल्या त्या वक्तव्याचा केंद्रीय परिवहन मंत्री यांनी विरोध केला असून पवार यांचे वक्तव्य पवार यांचे वक्तव्य बेजबाबदार आणि निषेधार्थआहे असे देखील म्हटले आहे. 

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सातत्याने सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात उभा राहिला आहे. इस्रायलमधील दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी केलेला तीव्र निषेध हे जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठीच्या आपल्या अटल वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. राष्ट्रहित आणि राष्ट्रीय सुरक्षेला राजकीय विचारांनी कधीही बाधा आणता कामा नये हे शरद पवारांसारख्या ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे, असा खोचक सल्ला देताना गटकरी यांनी म्हटले, की राष्ट्रीय सुरक्षा ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि आपल्या राष्ट्रहिताचे रक्षण करताना एकता आणि सहमती असली पाहिजे. परिस्थितीच्या गंभीरतेमुळे राजकीय संबंध किंवा वैयक्तिक मतांची पर्वा न करता दहशतवादाविरुद्ध एकसंध राहणे आवश्यक आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close