क्राइम

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच प्रेमी जोडप्याचे शव आढळले कार मध्ये

Spread the love
नोएडा /विशेष प्रतिनिधी
एकीकडे देशात 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाइन दिवस साजरा होत असतानाच एका प्रेमी जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एक कार खूप वेळची उभी असल्याने लोकांना संशय आला. त्यांनी कार जवळ जावून पाहताच त्यांना कारच्या समोरच्या सीटवर तरुण आणिं तरुणीचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आले. नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविले असता पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी पोहचली.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे धक्कादायक घटना घडली. सेक्टर 107 जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारमध्ये एका जोडप्याचा मृतदेह आढळून आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कारच्या पुढच्या सीटवर हे दोन्ही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले. या दोघांनाही गोळ्या घालण्यात आल्याचेही समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

काय घडलं?

शनिवारी (14 फेब्रुवारी) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सेक्टर 107 जवळ रस्त्याच्या कडेला एक कार बराच वेळ उभी होती. ही कार पाहून स्थानिकांना संशय आला. काही लोक या कारच्या जवळ गेले तेव्हा त्यांना समोरच्या सीटवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले एक जोडपे पहायला मिळाले. यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. यानंतर सेक्टर 39 पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी कारचा दरवाजा उघडला आणि दोघांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झालेला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील मृत तरुणाचे नाव सुमित असून तो दिल्लीच्या त्रिलोकपुरी भागातील रहिवासी आहे. तसेच या घटनेतील तरुणीचे नाव रेखा असे असून ती नोएडातील सेक्टर 58 येथील रहिवासी आहे. हे दोघे एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखत होत आणि या दोघांमध्ये प्रेम प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे.

पोलिस अधिकारी काय म्हणाले?

पोलिस अधिकारी प्रवीण कुमार म्हणाले की, प्रथमदर्शनी हे प्रकरण प्रेमप्रकरण असल्याचे दिसत आहे. दोघांनी एकमेकांवर गोळी झाडून आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे, मात्र याबाबत स्पष्टता नाही. यामागे तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग असू शकतो का याचाही पोलिस तपास करत आहेत.

पिस्तूल आणि काडतुसे जप्त

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली होती. टीमने कार आणि आजूबाजूच्या परिसरातून पुरावे गोळा केले. या ठिकाणी एक पिस्तूल आणि काही काडतुसे देखील आढळून आली. त्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. पोलिसांनी मृतांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली आहे आणि त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close