क्राइम

तहसील कार्यालयातील दासतलेखकावर चाकूने हल्ला , मृत्यू 

Spread the love

हल्लेखोराला पोलिसांनी अवध्या पाच तासात केली अटक 

कारंजा / विशेष प्रतिनिधी

तहसील कार्यालय परिसरात दासतलेखक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर तेथे आलेल्या युवकाने चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.  त्यात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.हरिचंद्र विलास मेश्राम वय ४२ असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  हल्ल्यानंतर उपपस्थितांनी हल्लेखोरला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने लोकांवर दगडफेक करत पळ काढला. पोलिसांनी आरोपी युवकाला अवध्या पाच तासात जेरबंद केले आहे.

हरीश चंद्र विलास मेश्राम ४२ हे तहसील कार्यालयात दासतलेखक म्हणून काम।करतात. १ मार्च ला दुपारी १ वा. चे दरम्यान ते आपल्या कामात व्यस्त असतांना एक युवक तेथे आला .आणि कोणाला काही कळायच्या आत त्यांने मेश्राम यांच्यावर चाकूने सपासप वार केले.आणि पळून गेला. त्याला उपस्थितांनी पकडण्याचा प्रयत्न केला पण तो लोकांवर दगडफेक करत पळण्यात यशस्वी झाला.

उपस्थितांनी मेश्राम यांना ग्रामीण रुग्णालयात नेलं3 असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.  कारंजा शहर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून प्राप्त झालेल्या तक्रारीवरून अवघ्या पाच तासात आरोपीला गजाआड करून आपल्या कार्याची चुणूक दाखवली. या घटनेमगिल कारण अध्याप कळू शकते नाही. पोलीस तपासात याचा उलगडा होईल.”

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close