सामाजिक

दिव्यांगाना एसटी बसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण

Spread the love

महामंडळाकडून नुकतेच परिपत्रक जारी
दिव्यांग प्रवाशांनी महामंडळ व शासनाचे मानले आभार
प्रतिनिधी… आर्वी..
“बहुजन-हिताय-बहुजन-सुखाय या धोरणानुसार वाटचाल करणाऱ्या व सदैव प्रवाशांच्या हितासाठी वाटचाल करणाऱ्या, एसटीमहामंडळाच्या,अधिकाऱ्यांनी क्रांतिकारक व दूरगामी निर्णय घेण्यास सुरुवात केल्याने, प्रवाशांनी समाधान व आनंद. व्यक्त केला आहेत.
नुकताच महामंडळाने,दिव्यांग प्रवाशासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्वच प्रकारच्या बसगाड्या मध्ये कायमस्वरूपी आसने देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने महाराष्ट्रातील संपूर्ण दिव्यांग प्रवाशांनी शासनाचे व महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
… ..वस्तुतः कोणत्याही थांब्यावर दिव्यांग प्रवासी बसमध्ये चढल्यास त्यांना आरक्षित आसन उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी मुख्यतः वाहकांची असणार आहेत. एसटीमहामंडळाच्या वाहतूक विभागाने नुकतेच या महिन्यात परिपत्रक काढुन, एसटीमहामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये दिव्यांगाना आसने आरक्षित आसने निश्चित केली आहेत. त्यानुसार आता”लालपरिपासून” ते शिवशाही-शिवनेरी पर्यंत बसमध्ये दिव्यांग प्रवाशासाठी आरक्षित आसने सुरक्षित ठेवण्याची सूचना स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत.
.. यदाकदाचित दिव्यांग प्रवासी नसल्यास ते आसन सर्व सामान्य प्रवाशांना वापरता येईल ,मात्र प्रवासादरम्यान,जर दिव्यांग प्रवासी बसमध्ये चढल्यास ते आरक्षित आसन त्यांना उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित बसच्या वाहकांची असेच. बसमधून चढ-उतार करतांना दिव्यागांना विशेष प्राधान्य द्यावे, त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना योग्य त्या सूचना देऊन बसमध्ये उतरण्यासाठी चालक-वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
*बसमधील आरक्षित जागा माहिती*
बसप्रकार ..आसन क्रमांक
साधी बस ३,४,५,६
निम-आराम ३,४
ईशिवाई ३,४,५,६
शिवशाही … ३,४,५,६
विनावातानुकुलित
शयनयान . ७
ईव्ही ३५आसनी ३,४
मिडी …. … .३०,३१
विनावातानुकुलित
शयन-आसनी……..०६

एसटी महामंडळाने दिव्यागांना आता विविध प्रकारच्या बसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण देण्याचा निर्णय हा क्रांतिकारक स्वरूपाचा असुन शासनाने, विशेषतः एसटीमहामंडळाने आमच्या दिव्यांग प्रवाशांना कायमस्वरूपी आरक्षण देण्याचा निर्णय स्तुत्य आहेत. बसमध्ये दिव्यागांना कायमस्वरूपी आरक्षण मिळावे, यासाठी आमची मागणी होती. आता मात्र ती पुर्ण करण्यात आली, त्या बद्दल एसटीमहामंडळाचे मी आभार मानतो.

शभम विजयराव टाके

दिव्यांग प्रवासी आर्वी

 

दिव्यांग प्रवाशासाठी एसटीमहामंडळ सदैव सेवेसाठी कट्टिबद्ध असते. प्रवाशामुळे महामंडळाचा आर्थिक डोलारा चालत आहेत. त्यामुळे त्यांच्या उचीत व न्यायपुर्ण मागणीचा शासनाने व एसटीमहामंडळाने,अधिकाऱ्यांनी सखोल व विचाराअंती निर्णय घेतला त्याचे मी वाहक या नात्याने यथोचित स्वागत करतो. तसेच वाहक या नात्याने बसमध्ये चढण्यासाठी मी प्रथमतः दिव्याग
प्रवाशांना विशेष प्राधान्य देईल
*एक वाहक*
आर्वी जिल्हा वर्धा
………………….

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close