शेतकरी राजाला यावर्षी निसर्ग दादा साथ देणार काय
निसर्ग राजा यंदा तरीही शेतकऱ्यांना दगा देवू नकोस*
शेतकऱ्यांची देवाला आर्त हाक,खरीपपुर्व मशागतीची तयारी*
आर्वी.. प्रतिनिधी
आर्वी तालुक्यात मागील गेलेल्या काळात ऊन्हाचा पारा४४अंशावर पोहोचला होता, दुपारी ऊन्हातान्हात घराबाहेर निघणे कठीण झाले होते. मात्र शेतीची आवश्यक कामे कराविच लागणार असल्याने जगाचा पोशिंदा शेतकरी रखरखीत ऊन अंगावर झेलत खरीपपुर्व मशागतीत.व्यस्त आहेत. सोबतच निसर्ग राजा यंदा तरी आम्हाला दगा देऊ नको, अशी आर्त हाक शेतकरी बांधव निसर्गाला देत आहे.
.दरवर्षी प्रमाणेच यंदाही शेतकरी बांधवाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडले आहेत. वास्तविक पाहता उत्पादन खर्च वाढला, त्या तुलनेत उत्पादन शेतकऱ्यांना होत नाहीत. त्यातच मालाच्या भावबाजीत मोठी तफावत असल्याने शेतकरी मेटाकुटीला येवून आर्थिक संकटात सापडला आहे. तसेच केवळ निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीचे दिवस आता संपले आहे. तसेच ग्लोबल वार्मिंगमुळे निसर्ग साथ देत नाहीत. शासन व प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला तयार असतांना मधले दलाल व अडत व्यापारी शेतकरी बांधवांना अपेक्षित मोबदला व फायदा मिळू देत नाहीत. सारीच यंत्रणा शेतकऱ्यांना मारक ठरू पाहत आहे?????तरीही मोठ्या ताकदीने व स्वतः हिमतीवर बळीराजा शेती व्यवसाय करीत आहे. यंदा तर जागतिक घडामोडीमुळे शेतमालाचे दर कोलमोडल्याने आपला माल व्यावसायिक व व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने कापूस, तूर व सोयाबीन विकावा लागला आहे. त्यामुळे त्याचा आर्थिक फटका शेतकरी बांधवांना बसला आहे.
त्यामुळे कर्जाचा ससेमिरा व फास दिवसोदिवस घट्ट होत चालला आहेत?????
उद्याचे मोठे स्वप्न डोळ्यात साठवून शेतकऱ्यांनी शेतीची मशागत सुरू केली आहेत. यंदा उत्पादन कमी आणि मालाचे दरही कमी अशी अवस्था बळीराजाची झाली आहे. उत्पादन खर्च ही दरवर्षी वाढत आहे. तुलनेत यंदा ही शेतीमालाचे दर पडल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच दिसून येत आहे. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी कर्जबाजारी झाली आहेत तर श्रीमंत शेतकरी श्रीमंत झाला आहे. असे असले तरीही हार न मानता पुन्हा बळीराजा नव्या उमदीने शेती करायला सज्ज झाला आहे.
गतवर्षी पाऊस उशिरा आल्याने काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. आँगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील उभे पिके खरडून गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगाम काहिशा प्रमाणात वाया गेला होता. रब्बी हंगामातही वारंवार आलेल्या अवकाळी पावसाने पिकावर विपरीत दुष्परिणाम झाला होता, त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे आम्हाला अस्मानी नुकसान भोगावे लागते.
*गणेश* *देऊळकर*
शेतकरी आर्वीशेतकरी बांधव अस्मानी व सुलतानी संकटामुळे पार पिचुन गेला असुन, शेतीच्या व्यवसायात आर्थिक दुष्टया डबघाईस आला आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवाच्या मालाला किमान हमीभाव मिळावा, अशी मागणी आहेत. आमचा माल सरळ व्यापाऱ्यांनी न घेता सरकारने घेतल्यास आम्हाला उचीत मूल्य मिळवू शकते, त्यासाठी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून. देण्यासाठी सत्ताधारी व.विरोधी पक्षाच्या लोकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
*रविंद्र* *दलाल*
शेतकरी आर्वी जिल्हा वर्धा
……………………