सामाजिक

चार्जिंग बाईक ला आग, मुलीचा मृत्यू, दोघे होरपळले 

Spread the love

रतलाम / नवप्रहार ब्युरो 

                  पवर्यावरण संतुलन राखण्यासाठी इबाईक चे निर्माण करण्यात आले. ओण आता हीच इबाईक नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. चार्जिंग ला लावलेल्या बाईक मध्ये स्फोट झाल्याने घराला लागलेल्या आगीत 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. तर दोन लोक होरपळले आहेत. चिमुकली आपल्या आजोबांकडे सुट्टीनिमित्त आली असताना घडलेल्या या दुर्घटनेनंतर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रात्री ईलेक्ट्रिक बाईक चार्जिंगला लावल्यानंतर सगळे झोपले होते. स्फोटानंतर परिसरात खळबळ उडाली. या स्फोटात ईलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाली. तर बाजूला असलेल्या इतर गाड्यांनाही झळ बसलीय. स्फोटानंतर ही आग घरात पसरली. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. पण धुरामुळे श्वास गुदमरून 11 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला.

रतलाममध्ये पीएनटी कॉलनीत ईलेक्ट्रिक बाईकच्या स्फोटाची घटना घडली. भगवती मौर्य यांच्या ई बाईकचा स्फोट झाला. शनिवारी रात्री कुटुंबिय ईलेक्ट्रिक बाईकला चार्जिंग लावून झोपले. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोटानंतर घरालाच आग लागली. बाहेर पडता न आल्यानं 11 वर्षांच्या अंतरा चौधरी हिचा गुदमरून मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

स्फोटानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ईलेक्ट्रिक बाईक तपासासाठी पाठवलीय. तर फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत आहे. अंतरा चौधरी ही तिच्या आजी-आजोबांकडे सुट्टीसाठी आली होती. अंतराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close