हटके

वाचा मॅनेजरने कुठल्या कारणाने उतरवले महिलांचे कपडे 

Spread the love

नवी दिल्ली /” नवप्रहार मीडिया नेटवर्क 

                         मासिक पाळी ही महिला वर्गातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. पूर्वी या काळात महिलांना कुटुंबापासून वेगळे ठेवले जात होते. पण जसजशी लोकांत जागरूकता येत गेली तसतशी महिलांना मिळणाऱ्या वागणुकीमध्ये बदल होत गेला. पण एका पनीर कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेने चुकीने सॅनिटरी पॅड चुकीच्या डब्यात टाकल्याने मॅनेजर ईतका संतापला की त्याने कामावरील सगळ्या महिलांना कोणाची मासिक पाळी आली आहे हे तपासायला त्याने सगळ्या महिलांना कपडे काढायला लावले. मॅनेजमेंट ने त्या मॅनेजरला नोकरी वरून काढून टाकले आहे. पण या प्रकरणाची सगळीकडे चर्चा होत आहे.

 डस्टबिनमध्ये सॅनिटरी पॅड सापडलं म्हणून मॅनेजरनं लज्जास्पद कृत्य केलं. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. एका पनीर कारखान्यात महिलेनं चुकीच्या डस्टबिनमध्ये सॅनिटरी पॅड टाकले. यामुळे मॅनेजर संतापला आणि त्याने धक्कादायक कृत्य केलं. हे प्रकरण सध्या व्हायरल होत असून लोक संताप व्यक्त करत आहेत. केनियामधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. हे प्रकरण केनियाच्या ब्राउन फूड कंपनीचं आहे. या ठिकाणी महिलेनं चुकीच्या डस्टबिनमध्ये सॅनिटरी पॅड टाकलं.

यामुळे मॅनेजर खूप संतापला. मॅनेजरनं लाजिरवाणं कृत्य करत महिला कर्मचाऱ्यांना त्यांचं कपडे काढायला लावले. कारण त्याला कोणाची मासिक पाळी सुरू आहे हे तपासायचं होतं.  ब्राऊन्स फूड कंपनीनं महिला कर्मचाऱ्यांसोबत केलेल्या अशा लाजिरवाण्या कृत्याबद्दल मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकलं आहे. लिमुरू येथील पोलिसांनी सांगितलं की, या घटनेबद्दल तीन जणांवर आरोप करण्यात आला आहे. सिनेटर ग्लोरिया ओरवोबा यांनी पीरियड शेमिंगच्या विरोधात ही पोस्ट शेअर केली होती. या घटनेबद्दल कंपनीनं खेद व्यक्त केला. त्यांनी म्हटलं, कंपनी कर्मचार्‍यांना संवेदनशील करण्यासाठी आणि संवाद सुधारण्यासाठी धोरणे बदलण्याचा विचार करत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close