सामाजिक

घाटंजीत पक्षी,प्राणी व मनूष्याचे सेवेत फोटोग्राफी असोशिएशन्स घाटंजी व पी.सी.ए.पी.फौंडेशन च्या पुढाकारातून पानपोई उद्घाटन

Spread the love

 

घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवर

एकीकडे मनुष्य माणुसकी पासून दूर जात असतांणा मुक्या पक्षी प्राण्याणा उन्हाळ्यात चारा पाणी व्यवस्था व्हावी व श्रृष्टी सोंदर्या सोबतच आपल्या विचारातील व कृतीतील सोदर्य फोटोग्राफर असोसियशन्स घाटंजी चा गृप जपसत असून आज दि. २२.४.२३ रोजी घाटंजी-स्थानिक जयस्तंभ चौक पक्षी,प्राणी पाणपोई उभारण्यात आली. घाटंजी येथे पीसीएपी फौंडेशनच्या वतीने बगीचा तयार करून शहरातील मुख्य चौकाचे सौंदर्यात भर पडली असतानाच पक्षांकरिता सुंदर पाणपोई डबे तयार करून झाडाचे वर टांगून पाणी व चा-याची व्यवस्था करण्यात आली, तसेच मोकाट कुत्रे,बक-या, जनावरे याकरिता पिण्याच्या पाण्याची सोय केली तर, बाजारपेठेत दमलेल्या लोकांना विसावा व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या करिता घाटंजी सिटी फोटोग्राफी असोसिएशन सर्व पदाधीकारी व फोटोग्राफर मित्र गृप यांचे मोलाचे योगदान मिळाले.या पाणपोईचे उध्दाघाटन गुरुदेव मंडळाचे प्रचारक श्री. अनंतराव कटकोजवार गुरूजी यांचे शुभ हस्ते अक्षय तृतीया व रमजान ईद चे शुभ पर्वावर करण्यात आले.या प्रसंगी,राष्ट्रनिर्माण विचारधारा चे डाॅ.गजेंद्र ढवळे सर,हणूमान कुमरे सर, पीसीएपी फौंडेशनचे अध्यक्ष प्राऊटिस्ट मधुकर निस्ताने ,अनिल ढोणे,पांडुरंग किरनापुरे,भुषण शास्त्रकार, सुधीर बोबडे पाटील,यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे विशेष म्हणजे घाटंजी फोटो ग्रॉफर असोशिएशन्स व मधूकर निस्ताणे यांच्या पुढाकारातुन सर्व धर्म समभाव राखत अक्षय तृत्तीया व ईदच्या मूहुर्तावर पक्षी व मोकाट जणावरासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close