क्राइम

शरीर सबंध ठेवण्यासाठी पत्नी करायची ५ हजाराची मागणी ; प्रायव्हेट पार्ट वर अनेक वेळा वार 

Spread the love

बेंगरुळू /नवप्रहार ब्युरो

                     अलीकडे पती पत्नीच्या नात्यात लहानसहान कारणावरून भांडण होत असतात. आणि हे वाद पोलिसांपर्यंत पोहचतात. सामाजिक दृष्टिकोनातून पाहता पती पत्नीला शारीरिक संबंधास परवानगी ही लग्नानंतर आपसूकच मिळते. पण पत्नी शरीर सबंध ठेवण्यास पती कडे जर पैशाची मागणी करत असेल तर ? कदाचित असा प्रश्न पाहून तुमच्या मनात छे काय तरीच काय ? असा प्रश्न पडला असेल . पण एका इंजिनजर पतीने पत्नी त्याच्यासोबत एखाद्या बाजारु बाई  प्रमाणे वागत असल्याची पोलिसात तक्रार केली आहे. शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ती त्याला ५ हजार रुपयांची मागणी करते असे त्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

पतीने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केलीय. तसंच पत्नीने अनेकदा प्रायव्हेट पार्टवर वार केल्याचाही आरोप पतीने केलाय. आता पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

पीडित पतीचं ऑगस्ट २०२२ मध्ये लग्न झालं होतं. लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतरच पत्नीने पतीशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. पतीने पत्नीला समजावून सांगत प्रोटेक्शनबद्दल सांगितलं. पण पत्नीने पतीला त्यासाठी ५००० रुपयांची मागणी केली. पीडित इंजिनिअर पतीने असाही आरोप केला की, पत्नीसोबत जेव्हा जेव्हा शरीरसंबंधाची मागणी केली तेव्हा पत्नीने अनेकदा प्रायव्हेट पार्टवर वार केले.

पतीने पत्नीसह सासू-सासऱ्यांवरही आरोप केले आहेत. पत्नी आणि तिचे आई-वडील पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ करायचे. पीडित पतीने असाही दावा केला की, वर्क फ्रॉम होम करताना पत्नी नेहमी वाद घालायची. यामुळे कामात अडथळा यायचा, परिणामी नोकरीही गमवावी लागली.

पतीने तक्रारीत म्हटलं की, जेव्हा तो वर्क फ्रॉम होम करायचा तेव्हा वरिष्ठांसोबत व्हिडीओ कॉलिंगवेळी पत्नी लॅपटॉपसमोर येऊन डान्स करायची. तिच्या या वागण्यामुळे नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. शेवटी या छळाला कंटाळून इंजिनिअर पतीने घटस्फोट मागितला तेव्हा पत्नीने ४५ लाख रुपये मागितले. जर जबरदस्ती केली तर सुसाइड नोट लिहून आत्महत्या करेन अशी धमकीसुद्धा दिली. पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली तेव्हा तिने चौकशीत सांगितलं की, मला त्याच्यासोबत रहायचं नव्हतं.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close