क्राइम
दिल्ली / नवप्रहार डेस्क
एका अल्पवयीन हिंदू मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिला OYO हॉटेल वर नेऊन धर्मांध तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तरुणीच्या भावाने पोलिसांत तक्रार केली.पोलिसांनी तरुणाला अटक केली असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
दिल्ली नजीकच्या नोएडातील सेक्टर -69 येथील ट्रान्सपोर्ट नगरमधील एका कंपनीत सफाई काम करणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुस्लिम तरूणाने या तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि ओयो हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित तरूणीच्या भावाने या प्रकरणी तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशनच्या प्रभारी निरीक्षकांनी सांगितलं की, `आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.`
दिल्लीतील संगम विहार येथील रहिवासी असलेल्या पीडितेच्या भावाने पोलिसांना सांगितले की, `सध्या मी कुटुंबासह सेक्टर -123 येथील एका भाडेतत्त्वावरील घरात राहतो. माझी 16 वर्षांची बहीण ट्रान्सपोर्टनगर येथील एका कंपनीत सफाईचे काम करते. त्याच कंपनीत एजाज नावाचा तरुण काम करतो. तो मूळचा फरिदाबाद येथील आहे. 17 नोव्हेंबरला बहीण घरी आली नाही. तिचा शोध घेतला असता ती सेक्टर-66 येथील एका ओयो हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली. मी तिथं पोहोचलो आणि एजाजला रंगेहाथ पकडलं.` पीडितेनं सांगितलं की, `आरोपीनं माझ्यावर बलात्कार केला.` पोलिसांनी पीडितेच्या जबाबानुसार आरोपीला अटक केली आहे
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |