सामाजिक

9 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार

Spread the love
अमृतसर / नवप्रहार वृत्तसेवा 
          देशात महिलांवरील अत्याचारात दिवसागणिक वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कायदे कडक करून देखील बलात्कार , लैंगिक छळ यात कुठलाही अंकुश लागल्याचे आढळत नाही. अश्यातच आता मुलांवरील अत्याचारात देखील वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पंजाब मध्ये एका 9 वर्षाच्या मुलावर चॉकलेट आणि चिप्स चे आमिष देऊन बलात्कार झाला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधल्या खन्ना नावाच्या गावात एका व्यक्तीने इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या मुलावर बलात्कार केला. आरोपीने नऊ वर्षांच्या मुलाला चॉकलेट आणि चिप्स देण्याचं आमिष दाखवून स्मशानभूमीत नेलं आणि तिथे त्याच्यावर अत्याचार केला.
ही घटना घडली त्यापूर्वी पीडित मुलगा शेतातल्या कूपनलिकेजवळ खेळत होता. तिथेच आरोपीने मुलाला चॉकलेट आणि चिप्स दिले. मुलगा निवांत खेळत असल्याचं बघून त्याची आई तिथून आपल्या कामाला गेली. त्यानंतर आरोपीने मुलाला स्मशानभूमीत नेलं आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराने घाबरलेल्या मुलाने आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून मुलाची आई घटनास्थळी पोहोचली. आईला पाहताच आरोपीने तेथून पळ काढला.
आईने मुलाला घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पीडित मुलावर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार करण्यात आले. पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी आरोपीविरुद्ध गैरवर्तन आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. डीएसपी राजेश शर्मा यांनी सांगितलं, की या प्रकरणातल्या दोषीला कडक शिक्षा दिली जाईल.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close