क्राइम

या कारणाने व्यक्तीने कापून घेतले स्वतःचेच गुप्तांग 

Spread the love
लखनऊ  / नवप्रहार मिडिया 

                  म्हणतात न की राग हा फक्त दोन मिनिटांचा असतो पण त्याचे  परिणाम मात्र आयुष्यभर भोगावे लागतात. असाच प्रकार एका व्यक्ती सोबत घडला आहे. त्याच्यावर त्याचा  लहान बहू आणि त्याच्या पत्नी कडून जे आरोप लावण्यात येत होते त्यामुळे तो इतका विचलित झाला होता की त्याने रागाच्या भरात स्वतःचे गुप्तांग कापून घेतले. त्याला शेजाऱ्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पाहिल्यावर रुग्णालयात दाखल केले. जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

धाकटा भाऊ आणि त्याची पत्नी यांच्याकडून सतत होत असलेल्या विनयभंगाच्या आरोपाला कंटाळून या पुरुषाने हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. सहारणपूर परिसरातील नागल पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावामध्ये ही घटना घडली आहे. 58 वर्षीय पुरुष अविवाहित आहे. धाकटा भाऊ आणि भावजयीकडून सतत विनयभंगाचा आरोप करण्यात येत असल्यामुळे हा पुरुष त्रासलेला होता. त्यांच्यात सतत वाद होत असत.
गुरुवारी त्यांचं मोठं भांडण झालं. या भांडणाचं रुपांतर थेट मारामारीमध्ये झालं. त्यामुळेच संतापाच्या भरात या पुरुषाने आपल्या खोलीत जाऊन ब्लेडच्या सहाय्याने आपलं गुप्तांग कापलं. त्यानंतर प्रचंड वेदनांनी विव्हळण्याचा त्याचा आवाज ऐकून शेजारी धावत आले आणि त्यांनी त्याला उचलून रुग्णालयात दाखल केलं
गुप्तांगाला इजा केल्यामुळे त्याच्या शरीरात प्रचंड रक्तस्त्राव झाला. सहाजिकच त्याची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. धाकट्या भावाच्या पत्नीचा विनयभंग करीत असल्याचा आरोप सहन न झाल्यामुळे त्याने हे पाऊल उचललं आहे. पोलिसांना कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झाली नसली तरी त्यांच्याकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close