बेवारस पडलेली बॅग उघडताच उपस्थित दूर पळाले

असे काय होते त्या बॅग मध्ये ?
मुंबई /. नवप्रहार ब्युरो
सहसा बेवारस पडलेल्या बॅगेला कोणीच हात लावत नाही.कारण याबद्दल पोलिसांकडून बेवारस बॅगेत स्फोटक पदार्थ असू शकतात आणि अशा वस्तूंना हातबळवल्यास तुमचा आणि इतरांचा जीव जाऊ शकतो असे सांगण्यात येत असल्याने कोणी बेवारस बॅगेला शिवत नाही. पण मांडवी ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका दर्ग्यासमोर बेवारस बॅग पाहून जेव्हा काही तरुणांनी बॅग उघडून बघितली तेव्हा त्यांच्यासह असलेले उपस्थित दूर पळाले.
बॅगची चेन उघडल्यानंतर जे दिसलं, त्यामुळे तरुणांचा थेट थरकाप उडाला. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र हा सगळा प्रकार पाहून पोलीसही हादरून गेले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडला आहे. येथील विरार फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिरकुंडा दर्गा आहे. या दर्ग्यासमोर गुरुवारी (१३ मार्चला) एक ट्रॅव्हल्स बॅग पडली होती. बराच वेळ ही बॅग तशीच पडून होती. आजुबाजुला कुणी दिसत नव्हतं. त्यामुळे ही बॅग कुणाची आहे, याचीच काहीच कल्पना कुणाला नव्हती.
दरम्यान, एक तरुणांचं टोळकं मांडवी जवळील गावात जात होतं. तेव्हा पिरकुंडा दर्ग्याजवळ त्यांना बेवारस पडलेली एक ट्रॅव्हल्स बॅग दिसली. त्यांनी बॅगेची चेन उघडून आतमध्ये काय आहे, हे पाहण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणांना बॅगेत एका महिलेचं कापलेलं शीर (मुंडकं) आढळून आलं. हा प्रकार पाहून सर्व तरुणांचा थरकाप उडाला. ही बाब लक्षात येताच तरुणांनी मांडवी पोलिसांना या घटनेची माहिती दिसली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करत गुन्हा दाखल केला. तसेच आसपासच्या परिसराची पाहणी केली असता पोलिसांना इथं आणखी एक सुटकेस आढळली. त्यात इतर काही वस्तू आढळल्या आहेत. याच परिसरात महिलेचे अवयव टाकले असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. चार पाच दिवसांपूर्वी ही हत्या केली असावी, असा अंदाजही पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला. पोलीस महिलेची ओळख पटवत आहेत. मात्र अशाप्रकारे बॅगमध्ये महिलेचं मुंडकं आढळल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेचा पुढील तपास मांडवी पोलीस करत आहे.