राज्य/देश

बैसरन येथील घटनेनंतर हॉटेल च्या मागे जे सापडले ते पाहून .,

Spread the love

जम्मू काश्मीर / नवप्रहार ब्युरो

जम्मू काश्मीरमधील  पहलगाम  येथील बैसरन व्हॅलीत  झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरच्या पाहणीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

गोळीबाराच्या ठिकाणाजवळील छोट्या हॉटेल्स आणि टपऱ्यांच्या मागे सुमारे २५ ते ३0 गॅस सिलिंडर आढळून आले आहेत. यामुळे मोठा अनर्थ टळला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

२२ एप्रिल रोजी सायंकाळी बैसरन व्हॅली (Baisaran Valley) परिसरात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेनंतर पर्यटकांनी गजबजलेला हा परिसर पूर्णपणे ओसाड पडला. या भागात पर्यटकांसाठी चहा-नाश्त्याची सोय असलेल्या अनेक लहान टपऱ्या आणि हॉटेल्स आहेत.

हल्ल्यानंतर या लहान खाद्यपदार्थांच्या गड्या आणि तात्पुरत्या हॉटेल्सच्या मागील बाजूस मोठ्या संख्येने, म्हणजे सुमारे २५ ते ३० गॅस सिलिंडर सापडले. हे दृश्य गोळीबाराच्या वेळची भीषणता आणि गोंधळ दर्शवणारे होते.

हे सिलिंडर तिथे कसे आले याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे. गोळीबार सुरू असताना, घाबरलेल्या हॉटेल किंवा टपरी चालकांनी हे सिलिंडर आपल्या दुकानांच्या मागे फेकले असावेत, अशी शक्यता आहे. याचे कारण म्हणजे, जर एखादी गोळी सिलिंडरला लागली असती, तर मोठा स्फोट होऊन आग भडकण्याचा धोका होता.

या संभाव्य स्फोटामुळे जीवित व वित्तहानी आणखी वाढली असती. त्यामुळे, प्रसंगावधान राखून हे सिलिंडर सुरक्षित ठिकाणी फेकल्यामुळे मोठा अनर्थ टळला असावा, असे मानले जात आहे. हे दृश्य हल्ल्याच्या वेळच्या दहशतीची आणि गंभीर परिस्थितीची कल्पना देते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close